bjp shiv sena politicial issue over water reservation pruna river bridge politics
bjp shiv sena politicial issue over water reservation pruna river bridge politics sakal
अकोला

Akola News : पाणी आरक्षण...पूल... अन् राजकीय ट्रँगल!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील राजकारणात सध्या पाणी आरक्षण आणि गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलावर राजकीय वाकयुद्ध सुरू झाले आहे. भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा राजकीय ट्रँगल या विषयावरून निर्माण झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या ६९ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे तेल्हारा तालुक्यातील वान धरणावरून पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, त्यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

या आरोपावर प्रत्युत्तर देताना भाजपने शिवसेना आमदारांना श्रेयवादाचे राजकारण करू नका अन्यथा पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण गमावून बसाल, असा इशारा दिला आहे. एकीकडे पाणी आरक्षणावरून वाकयुद्ध सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने गांधीग्राम येथील बंद पुलासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्गावरील पुलाच्या उद्‍घाटनापूर्वी आंदोलन केले.

या आंदोलनावर भाजपने प्रतिक्रिया देताना हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीने मित्रपक्ष शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात केले काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर वंचितनेही प्रत्युत्तर देताना, भाजप जनप्रतिनिधीची पोलखोल करणारे आंदोलन केल्याने भाजपचे पितळ उघडे पडले असल्यानेच भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचा टोला लगाविला आहे.

भाजप फुकटचे श्रेय घेत आहे!

गांधीग्रामचा फुल नादुरुस्त झाला तेव्हा त्या परिसरातील लोकांनी एकत्र येत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आमदार नितीन देशमुख व शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर सहभागी झाले होते.

धरणे आंदोलन सोडत असताना बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी आंदोलन स्थळी बोलवून कृती समिती व नागरिकांनी सुचवल्याप्रमाणे पुलाचे काम, अंदाजपत्रक तयार करून केंद्र शासनास पाठवण्याचे निर्देश आमदार नितीन देशमुख यांनी दिले होते.

यादरम्यान भाजपच्या एकाही आमदाराने या पूला विषयी प्रश्न उपस्थित केला नाही. आता मात्र फुकटचे श्रेय घेत आहेत. ‘ये पब्लिक है ये सब जानती है’ असे संदेश सोशलय मीडियाच्या माध्यमातून टाकत शिवसैनिकांनी भाजपला टार्गेट केले आहे.

श्रेय घेण्यासाठी पाणी घालवू नका- थोरात

बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६९ खेडे हे खारपानपट्ट्याने शापीत असल्यामुळे या भागातील विहिरीला किंवा कुपनलिकेला गोड असे पिण्यायोग्य पाणी लागत नाही. म्हणून ‘हर घर नल हर घर जल’ या जलजीवन मिशनच्या योजनेत पाणी पुरवठा योजना मंजूर केली.

ही योजना अकोट मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांमुळे स्थगित झाली असेल तर बाळापूर मतदारसंघात एकटया भाजपला कसे काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम केले जात आहे.

पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाची असताना योजनेचे श्रेय जसे ठाकरे गटाचे आमदार नितिन देशमुख घेत असतील तर ते ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी अकोट मतदारसंघातील त्यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी बाळापूर मतदारसंघातील खारपानपट्टयात येणाऱ्या पाण्याला विरोध करत आहेत आधी त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे.

विनाकारण राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नये. तुम्ही बाळापुरात श्रेय घेण्यासाठी आंदोलनाचे नाटक करता आणि अकोट मतदारसंघात तुमच्या कार्यकर्त्यांना या योजनेच्या विरोधात पाठविता तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत फक्त खारपानपट्टयातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवू नका, असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य तेजराव थोरात यांनी केले आहे.

कोण काय म्हणाले?

वंचितचे आंदोलन शिवसेना आमदार हरवल्या साठी होते काय- भाजप प्रवक्ता गांधीग्राम आणि गोपालखेड हे दोन्ही गावे बाळापूर विधानसभा मतदारसंघात येतात गांधीग्रामचा पूल वापरण्यास अयोग्य झाल्याचा तसेच पुला तडा गेल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होता.

त्यामुळे जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने बंद केला होता. आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा करून त्यांचा मतदारसंघ नकसानाही पर्यायी मार्ग तयार करून घेतला. मात्र, खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी व कर्तव्याची जाण विसरल्यामुळे वंचितने जनआंदोलन केले काय,

असा प्रश्न भाजप प्रवक्त गिरीष जोशी यांनी उपस्थित केला आहे. गांधीग्राम आणि गोपालखेड हे दोन्ही गावे कोणत्या मतदारसंघात येतात याचा अभ्यास न करताच आंदोलन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करून खोटी प्रसिद्धी मिळविण्यासाठीही धडपड असल्याचा आरोपही गिरीष जोशी यांनी केला.

भाजपचे पितळ उघडे पडल्याने तडफडाट- राजेंद्र पातोडे

वंचित बहूजन युवा आघाडीने भाजप जनप्रतिनिधीची पोलखोल करणारे आंदोलन केल्याने भाजपचे पितळ उघडे पडले आहे. गेली सहा महिने जनता त्रस्त असताना सत्ताधारी भाजपचे जनप्रतिनिधी कुठे आहेत, याची विचारणा जनता करीत होती.

राज्य आणि देशात भाजप सत्तेत आहे, पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्रस्त जनतेने गांधीग्राम येथे अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यावर शासकीय निधीमधून दोन कोटी रुपयांचा तात्पुरती व्यवस्था प्रशासना कडून करण्यात आली असून, हा तकलादू पूल पहिल्याच पावसाळ्यात वाहून जाणार आहे.

परिणामी पुन्हा अकोट मार्ग बंद पडणार असल्याने या तकलादू कामाचे खोटे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सोंग वंचित युवा आघाडीच्या टीमने उघडे पाडले आणि भाजपची बनवाबनवी उघड केली. त्यावर भाजपचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी आकांडतांडव सुरू केला असल्याचा आरोप वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT