अकोला

हंड्याने एक-एका झाडाला पाणी देऊन पिके जगविली, पण काही खरं झालं नाही

सकाळ वृत्तसेवा

हंड्याने एका- एका झाडाला पाणी देऊन पिके वाचवून उत्पादन काढतात. अहोरात्र मेहनत घेतली जाते. हे उत्पादक अतिशय आर्थिक परिस्थितीत गरीब असतात. रस्त्याच्या बाजूला बसून माल विक्री करतात. आज त्यांच्यावर संकट आलेले असताना एकही लोकप्रतिनिधी राजकीय सेवाभावी संस्था त्यांना मदतीचा हात पुढे करत नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागले.


धाड (जि.बुलडाणा) : जिल्ह्यात कडक लॉकडाउन कालावधीत येथील टरबूज, काकडीची विक्रीच झाली नसल्यामुळे तब्बल 15 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. टरबूज, काकडी उत्पादक शेतकरी अतिशय गरीब असून, त्यांची उपजीविका व पुढील खरिपाचे नियोजन याच फळावर अवलंबून असल्यामुळे हे कुंटुब आर्थिक मदतीसाठी टाहो फोडत आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज निर्माण झाली आहे. (Cucumber, watermelon crop failure, lockdown hits many farmers in dhad Buldana)

येथील अनेक कुटुंब हे नदीकाठी करडी धरणाच्या गाळपेर्‍यामध्ये लागवड करत असतात. टरबूज व काकडीची लागवड मोठ्या प्रमाणात करत आल्याने यासाठी त्यांना अपार मेहनत घ्यावी लागते. करडी धरणाच्या बुडीत क्षेत्रामुळे धरणाच्या शेजारील शेतात याची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते.

टरबूज, काकडी लागवडीसाठी सिंचनाची व्यवस्था नसते. बियाणे लागवडीनंतर सतत प्रत्येक झाडाजवळ हंड्याने पाणी आणून टाकावे लागते. यासाठी घरातील संपूर्ण कुटुंब लहानमोठ्यासह या कामासाठी धरणाच्या काठावर झोपडी बांधून तेथेच राहतात. वन्य प्राण्यांपासून ही फळे वाचविण्यासाठी रात्रभर जागावे लागते.

टरबूज व काकडी लागवडीसाठी खते, बियाण्यासाठी एकरी तीस हजार रुपये खर्च येतो. हा खर्च करण्यासाठी घरातील वस्तू विकून लागवड करावी लागते. मोठ्या कष्टाने यावेळी चांगला माल बहरला येतो. मात्र, विक्रीला आलेली फळे लॉकडाउनमध्ये विक्री न झाल्यामुळे जागेवरच सडली आहे.

टरबूज, काकडी यांचा चांगला माल येऊनही तो विक्री करू शकत नसल्यामुळे अनेक गरीब उत्पादकांवर मात्र पैसेच नसल्यामुळे उपासमारीची वेळी ओढवली आहे. लागवड खर्च झालेला असताना अनेक कुटुंब मात्र, लॉकडाउनमुळे हताश झालेली आहे. मध्यतंरी जोरदार हवेमुळे पावसामुळे सुद्धा या पिकांचे नुकसान झालेले आहे. मात्र, या पिकांना कोणताही विमा किंवा महसुल विभागाचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळत नसल्याने मोेठे संकट ओढवले आहे.

वास्तविक पाहता हंड्याने एका- एका झाडाला पाणी देऊन पिके वाचवून उत्पादन काढतात. अहोरात्र मेहनत घेतली जाते. हे उत्पादक अतिशय आर्थिक परिस्थितीत गरीब असतात. रस्त्याच्या बाजूला बसून माल विक्री करतात. आज त्यांच्यावर संकट आलेले असताना एकही लोकप्रतिनिधी राजकीय सेवाभावी संस्था त्यांना मदतीचा हात पुढे करत नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागले.

मी तीन एकर टरबूज, काकडी ही करडी धरणाच्या गाळपेर्‍यामध्ये लागवड केली होती. एकरी 30 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक झाडाला पाणी द्यावे लागते. कारण येथे विद्युतपंप, लाइन उपलब्ध नाही. कुटुंबासह पिकांची वन्यप्राण्यापासून वाचविण्यासाठी जागरण करावे लागते. विक्रीसाठी आलेली फळे लॉकडाउनमध्ये जागेवर सडत आहे. यामुळे आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
- कृष्णा भिमराव खेडकर, टरबूज उत्पादक, धाड.

संपादन - विवेक मेतकर

Cucumber, watermelon crop failure, lockdown hits many farmers in dhad Buldana

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

आजचे राशिभविष्य - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

SCROLL FOR NEXT