NCP and Congress   NCP and Congress
अकोला

पक्षांतराचे धक्के; काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत तर भाजपचा काँग्रेसमध्ये

कारंजा विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहणारा मतदारसंघ ठरला आहे

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यामध्ये कारंजा विधानसभा (Karanja Legislative Assembly) मतदारसंघ कायम चर्चेत राहणारा मतदारसंघ ठरला आहे. पक्षांतरे या मतदारसंघात नवीन नसले तरी गुरुवार या मतदारसंघाच्या भावी राजकीय आराखड्यासाठी टर्निंग पाॅईंट ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते मो. युसूफ पुंजानी यांना गळाला लावून नगर परिषद पक्षाच्या खाती जमा केली आहे तर मानोऱ्यात भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत डाॅ. संजय रोठे काँग्रेसवासी झाले आहेत. एकाच दिवशी झालेल्या या दोन पक्षांतराने जिल्ह्याची राजकीय गणिते फेरमांडणीस आली आहेत.

कारंजा नगर पालिकेतील विद्यमान भारिपचे १९ नगरसेवक तसेच मानोरा नगरपंचायतीचे चार नगरसेवक व माजी नगराध्यक्षसह शेकडो कार्यकर्त्यांनी मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वडसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (National congress party) प्रवेश केला.

आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमांतर्गत माजी जि. प. सभापती हेमेंद्र ठाकरे, कारंजा नगर परिषद उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, सत्ताधारी गटनेते व सभापती ॲड. फिरोज शेकूवाले, नगरसेवक सलीम गारवे, अ. एजाज अ. मन्नान, चांद शाह, जावेद्दोदिन शेख, इरफान खान, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, अब्दुल राशीद, जाकीर अली, आरिफ मौलाना, सय्यद मुजाहिद, निसार खान, डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, सोहेल अन्सारी, अब्दुल बशीर, शेषराव राठोड सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय रोठे यांच्यासह शेकडो समर्थकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. मानोरा पंचायत समितीचे माजी उपसभापती अंजार पटेल यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज, पक्षाचे निरीक्षक संजय बोडखे, प्रदेश चिटणीस दिलीप सरनाईक, जि.प. सभापती चक्रधर गोटे, जि.प. सदस्य अरविंद पाटील, दिलीप भोजराज, गजानन राठोड. डॉ. अशोक करसडे, दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ. संजय रोठे, मानोरा पंचायत समिती माजी उपसभापती अंजार पटेल, मानोरा ग्रा.प. माजी सरपंच अरुण गवई, सलाम ठेकेदार, बाजार समितीचे माजी संचालक प्रभाकर चिस्तळकर, माजी ग्रा.प. सदस्य गजानन बेंद्रे यांचे सह शेकडो महिला पुरुषांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT