Martyr Pradip Mandale has been cremated at Palaskhed Chakka in a mournful atmosphere 
अकोला

मातृतीर्थच्या सुपुत्राला अखेरचा निरोप ; शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गजानन काळुसे

सिंदखेड राजा (बुलडाणा) : भारतीय लष्कर व पोलिस यांच्याकडून बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात मातृतीर्थचे सुपुत्र शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी पळसखेड चक्का या ठिकाणी साडेबारा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान प्रदीप मांदळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती.

शहीद जवान प्रदीप मांदळे यांचा सहा वर्षाचा मुलगा जयदीप मांदळे याने मुखाग्नी दिली. यावेळी अमर रहे...अमर रहे वीर जवान प्रदीप मांदळे अमर रहे, भारत माता की जय...अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (ता. १५ डिसेंबर) रोजी काश्मीरमधील द्रासा सेक्टर येथे कार्यरत असताना शहीद झाले होते. शहीद जवान प्रदीप मांदळे यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता औरंगाबाद वरुन त्यांच्या मूळ गावी पळसखेड चक्का येथे पोहचले.

नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून ठिक ठिकाणी बॅनर लावून आदरांजली वाहण्यात आली. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या घरी त्यांचे पार्थिव काही वेळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले, यावेळी कुटूंबांतील सदस्यांनी एकच आक्रोश केला. कुटूंबियांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते. 

पत्नी कांचन मांदळे, आई शिवनंदा मांदळे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, लेफ्टनंट कर्नल मनीष तिवारी, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, खासदार प्रतिनिधी माधवराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाझेर काझी, जिल्हा परिषद मनोज कायंदे, सविताताई मुंढे, विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, शिवाजी राजे जाधव, एसडीपीओ सुनील सोनवणे, बीडीओ कांबळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, पळसखेड ग्रा.पं.प्रशासक भास्कर घुगे यांच्यासह देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथील माझी सैनिक संघटना शहीद प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

हे ही वाचा : राजकीय वातावरण तापले, गुप्त बैठका सुरू व मोबाइलवर सतत संपर्क 
 
त्यानंतर समता सैनिक दल, पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. भदंत शिवली बोधी, भदंत एस. धम्मसेवक यांनी बौद्धधम्म संस्कार पार पाडले. त्यानंतर शौर्य रस व करुणरसाच्या ओथंबलेल्या वातावरणात शहीद प्रदीप मांदळे यांचा पाच वर्षांचा चिमुकला जयदीप याने पार्थिवाला भडाग्नी दिला. त्यावेळी शहीद प्रदीप मांदळे अमर रहे आदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी व साहित्यिक अजीम नवाज राही यांनी केले.

पार्थिव आणण्यासाठी युवकांची रॅली

मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये शहीद जवान प्रदीप मांदळे यांचे पार्थिव आणण्यासाठी जवळपास ५०० युवकांची मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये युवकांनी शहीद जवान प्रदीप मांदळे यांचे बॅनर घेवून भारत माता की जय व प्रदीप मांदळे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. शहीद जवान प्रदीप मांदळे याच्या पार्थिवासोबत माळसावरगाव ते पळसखेड चक्का अशा २२ किलोमीटर मोटारसायकल रॅली तालुक्यातील युवकांनी काढली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील आमदारांनी शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला फिरवली पाठ

बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील पसळखेड चक्का गांवातील युवक जम्मू काश्मीर येथे शहीद होऊन या जवानाच्या अंत्यसंस्कार रविवारी(ता. २० डिसेंबर) रोजी गांवासह परिसरातील हजारो नागरिकांच्या शोकाकूल वातावरण पार पडला. मात्र, यावेळी देश सेवा करणाऱ्या शहीदवीर जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे वगळता जिल्ह्यातील इतर सहा आमदारांनी अंत्यसंस्कारला पाठ फिरवली असल्याने आज सर्वत्र उपस्थित नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT