Nagpur Marathi News How to get health facilities? 1,026 posts in the air for superspeciality, sanctioned for only 223 posts
Nagpur Marathi News How to get health facilities? 1,026 posts in the air for superspeciality, sanctioned for only 223 posts 
अकोला

कशा मिळणार आरोग्य सुविधा? सुपरस्पेशालिटीसाठी हवेत 1 हजार 26 पदे, मंजुरी फक्त 223 पदांनाच

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  निमवाडी परिसरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. परंतु शासनाने राज्यातील चार सुपर स्पेशलिटी रुग्णालयांमध्ये प्रथम टप्प्यांसाठी केवळ ८८ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली असून अकोला जिल्ह्यासाठी केवळ २२३ पदं मंजुर केले आहेत.

त्यामळे येथील रुग्णालयास कमी मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे कमी मनुष्यबळात रुग्णालय सुरू झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढेल व रुग्णांना सुद्धा योग्य आरोग्य सुविधा मिळेलच यासंबंधी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत होती. परंतु आता शासनाने पदनिर्मिता मंजुरी दिल्यामुळे सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू होण्याची शक्यता असली तर आवश्यक पदांच्या तुलनेत अल्प पद मंजुर केल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरीक्त ताण वाढेल.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

शासनाने मंजुर केलेली पदं
संवर्ग मंजुर
वर्ग-अ ०९
वर्ग-ब १०
वर्ग-क (नियमित) ९७
वर्ग-क (बाह्यस्त्रोताने) ०७
गट-ड (बाह्यस्त्रोताने) ८६
वरिष्ठ निवासी-१ ०५
वरिष्ठ निवासी-२ ०५
वरिष्ठ निवासी-३ ०४
एकूण २२३

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार विसरले रक्ताचे नाते; वडिलांचे मुलीला तर काकाचे काकूला चॅलेंज

पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हवे १०२६ पदं
सुपर स्पेशलिटी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी १ हजार २६ पदांना मंजुरीची आवश्यकता आहे. त्यात
वर्ग-१च्या ३५, वर्ग-२च्या १४५, वर्ग-३च्या २७७, वर्ग-३ (प्रशासकीय) ७७, वर्ग-३ (तांत्रिक) १०९, वर्ग-४च्या ३८३ पदांचा समावेश आहे.

हेही वाचा - आता बुलेटचा फटाका फुटला तर थेट जप्ती!

‘जीएमसी’वर वाढणार ताण
सुपर स्पेशलिटी रुग्णालयासाठी शासनाने अल्प पदं मंजुर केले आहेत. त्याचा ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर (जीएमसी) पडेल. जीएमसीमध्ये आधीच अनेक पदं रिक्त आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ताण-तणावात काम करावे लागते. त्यातच आता सुपर स्पेशलिटीच्या कामाचा ताण सुद्धा त्यांच्यावर पडण्याची दाट शक्यता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT