अकोला

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज ३०० च्यावर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी (Chain of corona infection) तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून (Akola District Administration) करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतरही अकोला जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या (Number of corona positive patients) दररोज ३०० च्यावर आहे. बुधवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या २४१३ अहवालांपैकी ३३० अहवाल पॉझिटिव्ह आलेत. दिवसभरात नऊ जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू (Death by corona infection) झाला. या सर्व निगेटिव्ह वातावरणात दिलासा देणारी बाब म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात ५२१ रुग्णांना डिस्टाचार्ज देण्यात आला. (The number of corona positive patients in Akola is over 300 per day)


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे २४१३ अहवाल प्राप्त झालेत. त्यात २१६१ निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी २५२ नव्या रुग्णांची भर पडली. त्यातच मंगळवारी (ता.२५) रॅपिड ॲंटीजेन टेस्टमध्ये ७८ पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३३० झाली.

अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ५४ हजार ५८७ वर पोहोचली आहे. त्याती एक हजार ३७ जाणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ४७ हजार ८७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या अकोला जिल्ह्यात पाच हजार ६७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील ५० टक्के रुग्ण गृह अलगिकरणात उपचार घेत आहेत.

  • तालुकानिहाय रुग्ण संख्या

  • मूर्तिजापूर (Murtijapur) -२६

  • अकोट (Akolt) -३१

  • बाळापूर (Balapur) -२६,

  • तेल्हारा (Telhara) -१७

  • बार्शीटाकळी (Barshitakali) -१६

  • पातूर (Patur) -२१

  • अकोला (Akola) -११५ (अकोला ग्रामीण-२३, अकोला मनपा क्षेत्र-९२)

  • पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणारे अधिक
    अकोला जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, पीकेव्ही येथील सहा, जिल्हा परिषद कर्मचारी येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, युनिक हॉस्पिटल येथील दोन, देवसार हॉस्पिटल येथील दोन, देशमुख हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, बबन हॉस्पिटल येथील तीन, ठाकरे हॉस्पिटल मूर्तिजापूर येथील दोन, केअर हॉस्पिटल येथील चार, आधार हॉस्पिटल येथील तीन, गोयंका हॉस्पिटल येथील तीन, फतेमा हॉस्पिटल येथील तीन, इन्फीनीटी हॉस्पिटल येथील दोन, क्रिस्टल हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ४२० असे एकूण ५२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

२३ वर्षीय युवकासह नऊ जणांचा मृत्यू
अकोला बुधवारी दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात खासगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये अकोला मनपा क्षेत्रातील मोठी उमरी येथील २३ वर्षीय युवकाचा समावेश आहे. त्याला ता. २३ मे रोजी उपचारासाठी दाखल केले होते. याशिवाय चरणगाव ता. पातूर येथील ६० वर्षीय महिला, खेर्डा खु. ता.बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष, चौहट्टा बाजार येथील २८ वर्षीय महिला, संत कव्हर नगर, अकोला भागातील ७३ वर्षीय पुरुष, काजळेश्वर ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष, अकोला येथील ५२ वर्षीय पुरुष आणि मलकापूर येथील ५६ वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.

संपादन - विवेक मेतकर

The number of corona positive patients in Akola is over 300 per day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार; पण भाजपच्याच आमदाराचा कडाडून विरोध

Year Ender 2025: कुंभमेळ्यातील मोनालिसा ते राजू कलाकार... या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले 'हे' ६ चेहरे, रात्रीत बनले सुपरस्टार

'लिव्ह -इनमध्ये राहू, ट्राय करु हे सगळं...' रिंकू राजगुरुने सिच्युएशनशिपबद्दल मांडली भूमिका, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Karad Crime:'कऱ्हाड तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी'; बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात..

SCROLL FOR NEXT