IPO Sakal
अर्थविश्व

लवकरच येणार Joyalukkas IPO! 2,300 कोटी उभारण्याची योजना

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केला आहे.

शिल्पा गुजर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केला आहे.

गोल्ड ज्वेलर्स जोयालुक्कास (Joyalukkas India Ltd) 2,300 कोटीचा आयपीओ (IPO) आणण्याच्या तयारी आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर केला आहे. जोयालुक्कास (Joyalukkas India) या आयपीओ मधून मिळणारी रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि कंपनीसाठी नवीन स्टोअर उघडण्यासाठी वापरणार आहे. एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. हेटॉन्ग सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लि. हे इश्यूचे लीड मॅनेजर्स आहेत.

ही कंपनीचे केरळमध्ये मुख्यालय आहे. कंपनीने संभाव्य शेअर (Shares) विक्री व्यवस्थेसाठी एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जेफरीज ग्रुप एलएलसी, क्रेडिट सुइस ग्रुप एजी आणि IIFL सिक्युरिटीज लिमिटेड यांची निवड केली आहे.

कोराना (Corona) संपल्यानंतर, भारतात सोन्याची खरेदी पुन्हा सुरु झाली. Joyalukkas मध्ये ब्रँड्सचे वर्चस्व असलेल्या बाजारपेठेत, टाटा समूहाचे तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लि. यासह वॉरबर्ग पिंकस एलएलसीने गुंतवणूक (Investment) केलेली प्रामुख्याने छोटी दुकाने/ज्वेलर्स यांचा समावेश आहे. जोयालुक्कासचे (Joyalukkas) देशभरात 85 शोरूम आहेत.

जगातील टॉप 100 लक्झरी ब्रँड

एका नवीन अहवालानुसार, जगभरातील शीर्ष 100 लक्झरी कंपन्यांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या पाच भारतीय ज्वेलरी ब्रँडमध्ये सुवर्णकार जोयालुक्कास इंडिया लिमिटेडचे नाव आहे. टाटा समूहाच्या टायटन कंपनीने टॉप 100 'ग्लोबल पॉवर्स ऑफ लक्झरी गुड्स'च्या यादीत तीन स्थानांची झेप घेत 22 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT