IPO Sakal media
अर्थविश्व

IPO: यथार्थ हॉस्पिटलचाही आयपीओ येणार; सेबीकडे कागदपत्रे सादर

यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लि. IPO आणायच्या तयारीत आहेत.

शिल्पा गुजर

Yathartha Hospital IPO : यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लि. IPO आणायच्या तयारीत आहेत. त्यांनी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) मसुदा कागदपत्रे सादर केली आहेत. IPO मध्ये 610 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल आणि विद्यमान भागधारक आणि प्रमोटर्सना 65.5 लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. या OFS मध्ये विमला त्यागी यांच्याकडून 37.43 लाख इक्विटी शेअर्स, प्रेम नारायण त्यागींकडून 20.2 लाख इक्विटी शेअर्स आणि नीना त्यागींवनी 7.87 लाख इक्विटी शेअर्स ऑफर केले आहेत. (Yathartha Hospital will also have an IPO; Submission of documents to SEBI)

निधी कुठे वापरणार?

इश्यूचे पैसे कंपनी आणि तिची शाखा AKS मेडिकल अँड रिसर्च सेंटरच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत कंपनी आणि तिच्या आर्मरवर अनुक्रमे 103.35 कोटी आणि 152.51 कोटी कर्ज होते. यथार्थ हॉस्पिटल दिल्ली-एनसीआरमध्ये तीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालवते. अलीकडेच कंपनीने मध्य प्रदेशातील एक रुग्णालय देखील विकत घेतले आहे.

कंपनी 137 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर फंडिंगसाठी वापरणार आहे. अधिग्रहणाद्वारे इनऑर्गॅनिक ग्रोथ आणि इतर धोरणात्मक उपक्रमांसाठी 65 कोटी रुपये निधी वापरेल. आयपीओसाठी इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रा. लि., अॅम्बिट प्रा. लि. आणि IIFL सिक्युरिटीज हे लीड मॅनेजर आहेत.

FY21 मध्ये कंपनीचा ऑपरेशनल रेव्हेन्यू 228.67 कोटी होता, जो एका वर्षापूर्वी 146.04 कोटी होता. या कालावधीत नफा 19.59 कोटी होता, जो एका वर्षापूर्वी 2.05 कोटी होता.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT