LIC policy google
अर्थविश्व

LIC Policy: एलआयसीच्या जीवन शिरोमणी स्कीममध्ये आरामात बनेल 1 कोटीचा फंड, वाचा कसं?

एलआयसीची जीवन शिरोमणी स्कीम ही नॉन-लिंक्ड लिमिटेड प्रीमियम मनी बॅक स्कीम आहे.

सकाळ डिजिटल टीम

एलआयसीची जीवन शिरोमणी स्कीम (LIC Jeevan Shiromani Plan) ही नॉन-लिंक्ड लिमिटेड प्रीमियम मनी बॅक स्कीम आहे. ज्यांची किमान मूळ विमा रक्कम 1 कोटी रुपये आहे. उच्च उत्पन्न गटातील लोकांना लक्षात घेऊन ही स्कीम बनवण्यात आली आहे.

तुम्हाला या पॉलिसीमध्ये 4 वर्षांसाठी दरमहा 94,000 रुपये जमा करावे लागतील. जे तुम्ही वार्षिक, सहा महिने, तीन महिने किंवा दरमहिन्याला भरू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याचे रिटर्न मिळणे सुरु होईल. ( LIC Jeevan Shiromani Plan update)

या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला सुरक्षितता आणि बचत दोन्ही मिळते. पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदतीच्या मध्यात मृत्यू झाला तर नॉमिनीला निश्चित रक्कम मिळते. यासोबतच तुम्ही जीवन शिरोमणी पॉलिसीवरुन कर्जही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्षासाठी पॉलिसी प्रीमियम भरावा लागेल.

सर्व्हायव्हल बेनिफिट

जीवन शिरोमणी पॉलिसीच्या सर्व्हायव्हल बेनिफिटमध्ये विमा रकमेची निश्चित टक्केवारी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये, 10व्या आणि 12व्या वर्षात 30% विमा रक्कम उपलब्ध असते.

दुसरीकडे, 16 वर्षांच्या पॉलिसीवर, 12 व्या आणि 14 व्या वर्षात 35 टक्के विमा रक्कम उपलब्ध आहे. तुम्हाला 14 व्या आणि 16 व्या वर्षी 18 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 40% विमा रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे, 20 वर्षांच्या पॉलिसीवर, 16व्या आणि 18व्या वर्षांमध्ये विमा रकमेच्या 45% रक्कम उपलब्ध असते.

अटी व नियम

18 ते 55 वर्ष वयोगटातील कोणीही जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात. यात चार पॉलिसी अटी आहेत. 14 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी वय 55 वर्ष आहे. त्याचप्रमाणे, 16 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 51 वर्ष, 18 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 48 वर्ष आणि 20 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी 45 वर्षाची अट आहे. पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे कमाल विम्याच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT