Money
Money e sakal
अर्थविश्व

दररोज फक्त शंभर रुपये गुंतवा अन् व्हा कोट्यधीश

सुमित बागुल

कोट्यधीश बनणे अवघड आहे पण वाटते तितके कठीणही नाही. तुमच्या इन्कममधून काही पैसे वाचवून गुंतवणूक करा आणि बघा काही वर्षात तुम्ही कोट्यधीश (How to become Millionaire) होता की नाही. पण यासाठी नियमित गुंतवणूक आणि योग्य सेव्हींग इन्स्ट्रुमेंट आवश्यक आहे. आज आपण अशाच काही इंस्ट्रूममेंट्सबाबत जाणून घेणार आहेत. ज्यामध्ये फक्त दररोज 100 रुपये टाकून तुम्ही 4.5 कोटींचे मालक बनू शकता. (Only save 100 rupees become a Millionaire sb01)

दीर्घ काळासाठी करा गुंतवणूक

कोट्यधीश बनण्यासाठी (How to become Millionaire) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीर्घ काळासाठीची गुंतवणूक. महागाई दर (Inflation rate), खर्च आणि मेडिकल सेवांवर होणार खर्च लक्षात घेऊन गुंतवणुकीची सुरूवात करावी लागेल. गुंतवणुकीसाठी काही इंस्ट्रूमेंट्स असे आहेत जे सतत तुमची गुंतवणूक वाढवत असतात. याच इंस्ट्रूमेंट्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता आणि सहज कोट्यधीश बनू शकता.

इक्विटी म्यूचुअल फंड

ज्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश व्हायचे आहे त्यांच्यासाठी इक्विटी म्यूचुअल फंड्स एक अत्यंत चांगला पर्याय असल्याची माहिती टॅक्स आणि इनव्हेस्टमेंट एक्सपर्ट्स यांनी दिली. जर कोणी व्यक्ती वयाच्या 30 वर्षांपासून गुंतवणुकीची सुरूवात करते तर त्यांचे येत्या 30 वर्षांत कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

कसे व्हाल करोडपती?

ट्रांससेंड कंसल्टंटचे वेल्थ मॅनेजमेंट डायरेक्टर कार्तिक झवेरी यांनी ही माहिती दिली. म्युचुअल फंडमध्ये 30 वर्षांसाठी 15 टक्के रिटर्नने (अंदाजे) गुंतवणूक केल्यास लवकरच कोट्यधीश होऊ शकता. कारण 30 वर्षात फिक्स्ड 15 टक्क्यांसोबत कम्पाउंडिंगचाही फायदा मिळेल. सोबतच दरवर्षी 10 टक्क्यांचा स्टेप-अप रेट ठेवावा लागेल.

जाणून घ्या कोट्यधीश बनण्याची ट्रीक

SIP मध्ये दर दिवशी 100 रुपये गुंतवणूक करा. 30 वर्षांसाठी गुंतवणुकीचे लक्ष्य निश्चित करा. वार्षिक 10 टक्के स्टेप अप रेट जोडत राहावे लागेल. 30 वर्षांनंतर तुमची मॅच्यूरिटी अमाउंट 4,50,66,809 रुपये असेल. म्युच्युअल फंड कॅलक्यूलेटरच्या हिशोबाने 30 वर्षात एकूण 59,17,512 रुपये गुंतवले, आणि ही संपत्ती वाढून 3,91,49,297 झाली. याच पद्धतीने स्टेप-अप रेट (Step-up rate) ची ट्रिक वापरून कोणीही कोट्यधीश होऊ शकते अशी माहिती ट्रांससेंड कंसल्टंटचे वेल्थ मॅनेजमेंट डायरेक्टर कार्तिक झवेरी यांनी दिली.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT