UPI Money Transfer Without Internet
UPI Money Transfer Without Internet 
अर्थविश्व

स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा युझर्ससाठी खास युपीआय सेवा (UPI Service) लॉन्च केली आहे. UPI 123PAY असं या नव्या सेवेचं नाव आहे. यामुळं ग्रामीण भागातही डिजिटल पेमेंट नेटवर्क वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. (Payment can be made even without smartphone RBI launches new UPI service)

या नव्या सेवेद्वारे असे युझर्सनाही पेमेंट करता येणार आहे, ज्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फीचर फोन आहे स्मार्ट फोन नाही. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही नवी सेवा मंगळवारी लॉन्च केली. आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ४० कोटी असे लोक आहेत जे अद्यापही फीचर फोनचा वापर करतात. दरम्यान, युपीआय पेमेंट करताना काही अडचण येऊ नये यासाठी चोवीस तास हेल्पलाईन सेवा देखील सुरु करण्यात आली आहे.

गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, समाजातील वंचित घटकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकही युपीआय सेवांचा वापर करु शकणार आहेत.

फीचर फोन म्हणजे काय?

फीचर फोन त्याला म्हणतात ज्यामध्ये केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा असते. देशातील बहुसंख्य लोक हेच फोन वापरतात. विशेषतः ग्रामीण भागात या फोन्सचा मोठा वापर होतो. पण या फोनमध्ये विविध अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा नसल्यानं अनेक नव्या सेवा अशा युजर्सना वापरता येत नाहीत. पण आता रिझर्व्ह बँकेनं UPI123PAY च्या मदतीनं फीचर फोनमध्ये स्मार्टफोनप्रमाणं डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे. युजर्सना याद्वारे कमीत कमी पेमेंटही करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT