Petrol diesel price| Petrol Diesel Rates Updates
Petrol diesel price| Petrol Diesel Rates Updates Sakal
अर्थविश्व

मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असतानाही राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्चे तेल महागल्यानंतरही भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सोमवारला कोणताही बदल केलेला नाही. 7 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेल 80 पैशांनी महागले होते. (petrol diesel todays update 9 may 2022)

मुंबईत सर्वात महाग पेट्रोल-डिझेल

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर कोलकात्यातही डिझेलच्या दराने शतकाचा आकडा गाठण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहे.

काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव खालीलप्रमाणे-

  • दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 120.51 रुपये तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये तर डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

  • नोएडामध्ये पेट्रोल १०५.४७ रुपये तर डिझेल ९७.०३ रुपये प्रति लिटर

  • लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये तर डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर

  • पोर्टब्लेअरमध्ये पेट्रोल ९१.४५ रुपये तर डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर

  • पटनामध्ये पेट्रोल 116.23 रुपये तर डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT