share market update
share market update  esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी अतिशय अस्थिर वातावरणात भारतीय बेंचमार्क इंडेक्स सलग सातव्या सत्रात घसरणीसह बंद झाले. गुंतवणूकदार आज (30 सप्टेंबर) होणाऱ्या आरबीआय धोरणाच्या बैठकीच्या निकालाची वाट पाहत आहेत. गुरुवारी सेन्सेक्स 188.32 अंकांनी म्हणजेच 0.33% घसरून 56,409.96 वर बंद झाला. तर निफ्टी 40.50 अंकांनी म्हणजेच  0.24% घसरून 16,818.10 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

खराब जागतिक आर्थिक वातावरणामुळे बॉन्ड यील्ड आणि डॉलर इंडेक्स झपाट्याने वाढल्याचे मोतीलाल ओसवाल फायनांशियलचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. त्यामुळे बाजारात मंदीची भीती निर्माण झाली आहे. आज आरबीआयकडून व्याजदर 50bps ने वाढवले जातील अशी शक्यता बाजाराला वाटत आहे. तर आज येणाऱ्या जीडीपी आणि नोकरीच्या आकडेवारीमुळे गुंतवणूकदारही सावध आहेत.

निफ्टी 17,000 च्या वर टिकू शकला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत दबाव निर्माण होऊ शकतो, असे दिसते. यामुळे निफ्टी 16600-16650 झोनकडे सरकताना दिसू शकतो असेही ते म्हणाले.

निफ्टी गुरुवारी मजबूत सुरुवात असूनही बेंचमार्क निफ्टी 200-दिवसांच्या SMA (सिंपल मूव्हिंग अॅव्हरेज) किंवा 17000 पातळीच्या वर टिकू शकला नसल्याचे  कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. गुरुवारी इंट्राडे टाइम फ्रेममध्ये निर्देशांकाने डबल टॉप फॉर्मेशन केल्याचे श्रीकांतने सांगितले. तो 16800 च्या पातळीवर सतत सपोर्ट  घेत आहे.

जोपर्यंत निफ्टी 16800 च्या वर ट्रेड करत आहे तोपर्यंत तो एक मोठी पुलबॅक रॅली पाहू शकतो. याच्या वर गेल्यास निर्देशांक पुन्हा 16950-17000 च्या पातळीवर जाऊ शकतो. पण, जर निफ्टी 16800 च्या खाली गेला तर निर्देशांक 16700-16650 च्या पातळीवर घसरू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)
टेक महिन्द्रा (TECHM)
बजाज ऑटो (BAJAJAUTO)
टायटन (TITAN)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
भारत फोर्ज (BHARATFORG)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTORS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT