Share Market Latest News Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली

सकाळ डिजिटल टीम

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सुरवातीलाच सेन्सेक्स 846.86 अंकांनी घसरला तर निफ्टी 16,250 च्या खाली गेली आहे.

शुक्रवारी सुद्धा शेअर बाजार कोसळला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले होते. सेन्सेक्स (Sensex) 866.65 अंकांनी म्हणजेच 1.56 टक्क्यांनी वधारून 54835.58 वर बंद झाला होता तर निफ्टी (Nifty) 271.40 अंकांनी म्हणजेच 1.63 टक्क्यांनी वधारून 16,411.25वर बंद झाली होती.

आरबीआयने व्याजदरात अचानक वाढ केल्यानंतर मागील आठवड्यापासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, यूएस फेडने व्याजदरात 0.50 टक्के वाढ जाहीर केल्यानंतर जागतिक बाजाराला काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र मागील आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसापासून शेअर बाजारात पडझड दिसून येत आहे.

LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस

देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. LIC चा IPO आज म्हणजेच सोमवारी बंद होत आहे. 4 मे रोजी IPO ची सुरवात झाली होती. विशेष म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील बोली घेण्यात आली. देशातील आयपीओ मार्केटमध्‍ये एखाद्या कंपनीचा आयपीओ सहा दिवस सुरू असल्याची कदाचित ही पहिलीच वेळ म्हणता येईल. रविवारपर्यंत 1.79 पट LIC IPO सबस्क्रिप्शन मिळाले. तुम्ही अजून यात गुंतवणूक केली नसेल तर आज तुमच्याकडे शेवटची संधी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT