SIP Investment google
अर्थविश्व

SIP Investment : लवकर गुंतवणूक सुरु करा, एसआयपी सर्वोत्तम पर्याय, कसा ते जाणून घ्या....

अशा परिस्थितीत जर तुम्ही वेळेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा मजबूत फायदा होऊ शकतो.

नमिता धुरी

मुंबई : बहुतेक तरुण वयाच्या 22-25 व्या वर्षी नोकरीला लागतात आणि त्यांची कमाई सुरु होते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्याचा सल्ला एक्सपर्ट्स देत असतात. तुम्ही किती गुंतवणूक केली यापेक्षा तुम्ही किती लवकर गुंतवणूक सुरू करता हे महत्त्वाचे आहे.

करिअरच्या सुरुवातीला जबाबदाऱ्याही कमी असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही वेळेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा मजबूत फायदा होऊ शकतो. हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

2500 रुपयांच्या एसआयपीवर मिळतील 40 लाख

लाँग टर्म गुंतवणुकीसाठी एसआयपी (SIP) हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण यात तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. समजा एखाद्याने 25 वर्षांचा असताना दरमहा 2500 रुपये जमा करायला सुरु केले. म्युच्युअल फंडामध्ये 12% प्रतिवर्ष परतावा मिळतो.

अशात एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, 25 वर्षांसाठी दरमहा 2500 ची एसआयपी केल्यास, निव्वळ परतावा 47.5 लाख असेल. या दरम्यान, गुंतवणुकीची एकूण रक्कम फक्त 7.5 लाख रुपये असेल, ज्यावर सुमारे 40 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

एसआयपीमध्ये कालावधीही खूप महत्त्वाचा आहे. समजा एखाद्याने 30 वर्ष दरमहा 2500 ची एसआयपी केली तर त्याचा निव्वळ परतावा 88.24 लाख होईल. 30 वर्षांमध्ये, तो एकूण 9 लाख रुपये जमा करेल, ज्यावर त्याला 79.2 लाखांचा परतावा मिळेल. म्हणजेच कालावधी केवळ 5 वर्षांपर्यंत वाढवून, परतावा जवळपास दुप्पट होतो.

किती गुंतवणूक करावी असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. अशात फायनांशियन मॅनेजमेंटच्या जगात, 50/30/20 नियम ठरवला गेला आहे. म्हणजे तुमचे सर्व आवश्यक खर्च तुमच्या उत्पन्नाच्या 50% पर्यंत मर्यादित ठेवा. गरजेव्यतिरिक्त इतर गोष्टींवर 30 टक्के खर्च करा. यामध्ये परदेशी सहल, कार खरेदी यासारख्या खर्चाचा समावेश होतो. कोणत्याही परिस्थितीत किमान 20 टक्के बचत करा. मात्र, बचतीवर अधिक भर दिला पाहिजे.

तुम्ही 30 हजार रुपये कमावत असाल तर किमान 6000 रुपये वाचवा आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करा. यामध्ये, जर तुम्ही म्युच्युअल फंडात 2500 रुपयांची एसआयपी केली, तर वयाच्या 50 व्या वर्षी तुम्हाला 47 लाख रुपये आणि वयाच्या 55 व्या वर्षी तुम्हाला सुमारे 88 लाख रुपये मिळतील.

मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT