SBI Bank esakal
अर्थविश्व

SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ; जाणून घ्या कारण!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पॉलिसी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बॅंकानी अशी वाढ केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील अनेक बॅंकांनी (Bank)मुदत ठेव म्हणजेच एफडीदर वाढविला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) पॉलिसी दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि HDFC बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.

एसबीआय एफडी रेट्स ( १५ फेब्रुवारी २०२२ पासून प्रभावी)- स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुधारित व्याजदर १५ फेब्रुवारी २०२२ पासून लागू आहेत. एसबीआयने २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एफडीवर व्याजदर वाढवले आहेत. पुढील २ ते ३ वर्षांसाठी व्याजदर ५.१० टक्क्यांवरून ५.२० टक्के करण्यात आले आहेत. तर २ ते ५ वर्षांच्या एफडीवरील दर हे १५ बेसिक अंकांनी वाढवून ५.४५ टक्के ठेवले आहेत. तर ५ ते १० वर्षांच्या मुदतीच्या FD ठेवींसाठी व्याजदर ५.५० टक्के करण्यात आले आहेत.

एचडीएफसी बॅंक एफडी रेट्स (१४ फेब्रुवारी २०२२ पासून प्रभावी) - अलिकडेच, एचडीएफसी बॅंकेने एक वर्षांच्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदर १० बेस पॉइंट्सवरून ५ टक्के केला आहे. तर ३ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील दर ५ बेस पॉइंट्सने वाढवून 5.45 टक्के केले आहेत. HDFC बँकेचे सुधारित व्याजदर 14 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.

सेंट्रल बॅक ऑफ इंडिया आणि युको बॅंकेनेही वाढवले व्याज दर - सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (Central Bank of India) आणि युको बॅंकेने (UCO Bank) आरबीआय एमपीसीने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केल्यानंतर फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. आता या दोन्ही बँकांचे नवे व्याजदर १० फेब्रुवारी २०२२ पासून लागू झाले आहेत.

महागाई दर वाढला - तज्ज्ञांच्या मते, बँकांनी एफडी दर वाढवण्याची घोषणा केली आहे. कारण भारतातील महागाई दर वाढले आहेत. मिंट रिपोर्टमध्ये जीसीएल सिक्युरिटीजचे रवी सिंघल यांनी सांगितले, की व्याजदरावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी महागाई हा एक महत्त्वाचा घटक आहे. महागाईचा दर जितका जास्त तितका व्याजदर वाढण्याची शक्यता जास्त असते. भारतातील महागाई दर उच्च पातळीवर वाढत असल्याने, अनेक बँका एफडी दर वाढवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT