sakal gofan blog esakal
Blog | ब्लॉग

गोफण | पत्रकारांवर बहिष्कार घालणाऱ्यांनी परिषदेत येऊ नये!

संतोष कानडे

''आणि म्हणोन, जर कुणी आपल्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर चेचलं पाहिजे... चेचला पाहिजे की नाही? बोला ना?'' पुढ्यात बहुसंख्येने उभ्या असलेल्या अंगरक्षकांनी एका सुरात 'होS होSS' म्हणत उत्स्फुर्तता दाखवली. ''एक्कच नाथ... साऱ्यांचा घात'' एकाने अशी घोषणा ठोकली.

जहागीरदार नाथबापू एकशिंगे आज सतर्क होते. मराठवाडप्रांतासाठी सरकारी खजान्यातून द्रव्याची लयलूट करण्याचा आज सोहळा होता. परंतु विरोधी गटातल्या एकाने त्यांना सवाल करण्याची गुस्ताखी केली होती. त्यामुळे नाथबापू जरासे अस्वस्थ होते. त्यांनी तातडीने फर्मान सोडत सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

ज्या सद्गृहस्थाने जहागीरदारांना तोंडावर सवाल-जवाब करण्याची दवंडी देऊन खुलं आव्हान दिलं होतं. तो सद्गगृहस्थ म्हणजे द्रोपदीच्या मयसभेसारखा होता. पहिल्यांदा बघितल्यावर तो तुम्हाला पत्रकार वाटेल परंतु तोंड उघडताच पुढारी भासेल. तुम्ही म्हणाल, हा तर नेता.. पण त्याहीपुढे जावून तो सत्तेची उलथापालथ करणारा धुरंधर माणूस आहे हे पटेल.

तुम्ही म्हणाल, मग माणूस मुत्सुद्दी दिसतोय.. म्हणजे शांत असेल. पण तसं नाही. मागे त्यांच्या मुखातून जाहीरपणे निसटलेले शब्द ऐकले तर कानात उकळतं शिसं ओतल्यागत यातना होतील. त्यामुळे सगळेच यांना टरकून असतात. नाथबापूंच्या कार्यपद्धतीवर ते आज जाहीरपणे टिपण्णी करणार होते.

नाथबापूंनी घाबरत..घाबरत पत्रकार परिषद सुरु केली. पटापट आवरायचं म्हणून शेकडो कोटींचे आकडे फेकायला सुरुवात केली. एवढं दिलं.. तेवढं देऊ..असं करु-तसं करु.. अशा सगळ्या शेंगा हाणून झाल्यानंतर दरवाज्याजवळ झटापट सुरु असल्याची दिसली. कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न करीत होतं परंतु सुरक्षारक्षक त्याला त्वेषाने मागे रेटत होते.

दुसरं-तिसरं कुणी नव्हतं. वेषांतर करुन तेच ते 'मितभाषी' बोलभांडे रौत आतमध्ये घुसण्याचा प्रयत्नात होते. परंतु द्वारपाल कम अंगरक्षकांनी त्यांना ओळखलं होतं. डाव फिस्कटला म्हणून बोलभांडेंनी जोरजोरात भांडायला सुरुवात करुन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. हा सगळा राडा पत्रकारांच्या कॅमेऱ्यांनी टिपला होता.

परिस्थिती हाताबाहेर गेलीय, हे ओळखून नाथबापूंमधला संत जागा झाला. त्यांनी अगदी प्रेमाने दाढीवरुन हात फिरवला.. शांत चित्ताने म्हणाले, ''काय चाललंय रे तिकडे? येऊ द्या येऊ द्या..'' बोलभांडे आत आले. ''मी आज पत्रकार म्हणून आलोय.. मला सांगा काय केलं तुम्ही ह्या दुष्काळी जनतेसाठी?''

नाथबापू आता एखाद्या धर्मगुरुसारखे भासत होते. चेहऱ्यावर स्मित, दाढीवर फिरती बोटं अन् डोळ्यात कारुण्य. उजवा हात आशीर्वादासारखा उंचावून 'अहम् ब्रह्मास्मी' असं म्हणतात की काय? असं उपस्थितांना वाटू लागलं. सगळ्यांच्या नजरा नाथबापूंवर खिळल्या.. आता ते काय बोलतात, हे ऐकण्यासाठी सर्वांनी देहाचे कान केले.

तोंडाद्वारे मंत्रोच्चार व्हावा, तसे ते बोलले- ''हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.. आणि म्हणोन आम्ही फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. हे बिचारे पत्रकार सर्वसामान्य पत्रकार आहेत. त्यांना अशा पगारी आहेतच किती? परंतु तुमच्यासारखे लोक पत्रकारांवरदेखील बहिष्कार घालतात... आणि म्हणोन आम्ही तुमच्यावर बहिष्कार घालतो.''

बोलभांडे रौतांची हवा बऱ्यापैकी निघून गेली होती. तरीही ते बळ एकवटून बोलले, ''मराठवाड्यातला पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न कोण सोडवणार? कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? हे लोक हिंदू नाहीत का?'' एवढं ऐकूनसुद्धा नाथबापूंमधला संतपणा आणि संथपणा कमी झाला नव्हता. त्यांनी तेवढ्याच संयमाने जशास तसं उत्तर दिलं-

''हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याने आम्ही फक्त सर्वसामान्य आणि प्लेन पत्रकारांना उत्तरं देऊ. पत्रकारांवर बहिष्कार घालणारे आम्ही नाहीत? आमच्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही काय बोलता? तुमचे लोक सनातनबद्दल वाईटसाईट बोलतात त्याचं काय? मी सनातनी आहे.. तुम्ही आहात का? आज या ठिकाणी जाहीर करुन टाका..बोला?''

या घनघोर संकटाने बोलभांडे पुरते कोलमडले... फक्त बाहेर कसं निसटायचं हाच यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. ''हिंदुत्व आणि सनातनबद्दल विचारता? पण यावर बोलण्याच्या अधिकार फक्त आमच्या पक्षप्रमुखांना आहे.. तेच यावर उत्तर देतील. आज या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वमान्य पत्रकारावर तुम्ही अन्याय केलाय.. जाहीर निषेध..जाहीर निषेधSS''

निषेधाची आरोळी ठोकत आपण उभ्या केलेल्या आरडाओरडीआडून बोलभांडे निघून गेले... इकडे नाथबापूंचे खांदे जोशाने उभे राहिले होते. त्यांनी छातीत हवा भरुन घेतली आणि प्रवचनटाईप अध्यात्मिक उंची गाठून पुन्हा सरकारी पोथ्या वाचायला सुरुवात केली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT