coronavirus how india lockdown different from china and italy information marathi
coronavirus how india lockdown different from china and italy information marathi 
कोरोना

चीन, इटलीतला आणि भारतातला लॉकडाऊन; वाचा फरक

सकाळ डिजिटल टीम

कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत लाखो स्थलांतरीत कामगार त्यांच्या गावी परत जात असल्याचे चित्र दिसत होते. काही लोक तर, शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत होते. फाळणीनंतरचे हे सर्वात मोठे मानवी स्थलांतर असल्याचे अनेकांनी वर्णन केले. पंतप्रधान मोदींनी देशभरात अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे हे स्थलांतर थांबले.  

एकीकडे 'जनता कर्फ्यू' सुरू असताना दुसरीकडे शासनाने रेल्वे व आंतरराज्य बस सेवाही बंद केल्या. शहरातून बेरोजगार झालेल्या स्थलांतरीत कामगारांकडे राहण्यासाठी घर नाही, अन्नासाठी पैसे नाहीत अशा परिस्थितीत त्याच्याकडे गावी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची परिणीती अनेकांचा उपासमार आणि मृत्यू होण्यात झाली.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यावसायिक, औद्योगिक, धार्मिक व संस्कृतीक कार्ये थांबवली गेली. लोकांना त्यांच्या घरी राहण्याचा आदेश दिला गेला. वाहतूक सेवा व देशांतर्गत विमानसेवाही बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी  करण्यासाठी देशात पोलीस व्यवस्थेचा कठोरपणे वापर करण्यात आला. अनेक ठिकाणी पोलिसांनी निरपराध लोकांवर लाठीमार केला. परिणामी भारतातील  लॉकडाऊन हे जगातील सर्वात कठोर होत गेले. भारतात  कोरोना व्हायरसचा अजूनही समुदाय संसर्ग झाला नाही. बळींची संख्याही तुलनेने कमी आहे. समुदाय संसर्ग नसतानाही लॉकडाऊनची अंमलबजावणी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे.

चीन-भारत काय आहे फरक?
लॉकडाऊनची ही संकल्पना चीनमधून आली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा उद्रेकबिंदू असलेले वुहान शहर बंद झाले आणि नंतर लवकरच देशाच्या मोठ्या भागात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमधे 76 कोटी लोकसंख्येचा समावेश होता. जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या या कृतीचे कौतुक केले. परंतु, याच्या दुप्पट म्हणजे एकशे तीस कोटी लोकसंख्या ही भारताच्या लॉकडाऊनमधे सामील आहे. चीनमधे लॉकडाऊन वेगवेगळ्या पातळीवर करण्यात आले तर भारतात लॉकडाऊनबाबत एक समान धोरण आहे. बीजिंगमध्ये बस सेवा सुरू होत्या. एका आठवड्यानंतर योग्य सुरक्षेचे उपाय करून कॅब सेवा सुरू करण्यात आल्या. देशांतर्गत विमान उड्डाण व रेल्वे सेवा  या केवळ काहीच प्रांतात बंद होत्या. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले. हे भारतात दिसले नाही. चीन आणि भारतातील लॉकडाऊनमधील मुख्य फरक हा आहे की चीनचे लॉकडाऊन हे कर्फ्यू नाही. भारतीय पोलीस लॉकडाऊन हे  केवळ दोन-तीन दिवसांचा असल्याप्रमाणे बळाचा वापर करत आहेत. पण, ते कदाचित पुढील काही आठवडे किंवा काही महिनेही चालेल.

इटलीने लॉकडाऊनमध्ये केल्या चुका
चीननंतर इटलीत कोरोना व्हायरसचा प्रसार सर्वाधिक झाला. चीनचे अनुकरण करून युरोपीयन देशांमधे  लॉकडाऊन सुरू झाले. संपूर्ण इटलीतही लॉकडाऊन झाले पण ते भारताएवढे कठोर नाही. इटलीत  लॉकडाऊन हे टप्प्याटप्प्याने लादण्यात आले.  21 फेब्रुवारीला केवळ उत्तर भागात तर नऊ  मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. तरीही भारताप्रमाणे इटलीतील सार्वजनिक वाहतूक सेवा कधीही बंद झाल्या नाहीत. भारताच्या तुलनेत इटलीत कोरोना व्हायरसमुळे झालेली मृत्यूची संख्या ही प्रचंड आहे. इटलीत एक पास व्यवस्था तयार केली गेली. त्यामुळे नागरिक त्यांच्या गरजेप्रमाणे बस किंवा विमान सेवांचा वापर करू शकतात. भारतात सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे.

आणखी वाचा - इथं भाजी मार्केट 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

श्रीलंका, बांग्लादेशचे नेटके नियोजन
भारतातील आरोग्य व्यवस्था ही दुबळी आहे हे त्यामुळे कदाचित लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु, भारताप्रमाणेच दक्षिण आशियातील अनेक देशांत आरोग्य व्यवस्थेची स्थिती सारखीच आहे. तरीही त्या देhttps://www.esakal.com/mumbai/bhiwandi-municipal-corporation-decides-keep-shivajinagar-market-close-till-14th-march-278693शांमध्ये लॉकडाऊनची इतक्या कठोरपणे अंमलबजावणी केली गेली नाही. बांगलादेशात सुरुवातीला दहा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. भारत व बांगलादेशातील लॉकडाऊनमधील एक फरक हा आहे की, भारतात स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी जाऊ नयेत ही अपेक्षा आहे तर, बांगलादेशमध्ये स्थलांतरित कामगारांना आधीच कल्पना देऊन त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले आहे. श्रीलंकेनेदेखील लॉकडाऊनपूर्वीच सुट्टी जाहीर केली आणि नंतर कर्फ्यू लागू केला. तोपर्यंत स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विशेष बस व रेल्वे सेवा सुरू केल्या. त्यामुळे तिथे भारतासारखी परिस्थिती उद्भवली नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT