दारू पिण्यासाठी केवळ 100 रुपये न दिल्याने गळ्यावर कात्रीने वार करून तरुणाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथील बेगमाबाद गावात शुक्रवारी रात्री प्रकार घडला आहे. मृत तरूणाचं नाव महेंद्र असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी (Police) आरोपींकडून हत्येत वापरलेली कात्री जप्त केली आहे.
पोलिस स्टेशन प्रभारी अनिता चौहान यांनी सांगितले की, 45 वर्षीय महेंद्र आपली पत्नी सविता देवी, मुले सागर, अमन आणि दर्पण यांच्यासोबत बेगमाबाद गावातील पीरवाली कॉलनीत राहत होते. तो मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. शुक्रवारी रात्री जेवण करून महेंद्र त्याच्या घरासमोरील रस्त्यावरून चालला होता. दरम्यान गावात राहणारा शिवा नावाचा व्यक्ती दारू पिऊन जात होता. शिवाने दारू पिण्यासाठी रस्त्याने चालत असलेल्या महेंद्रकडे 100 रुपये मागितले. महेंद्रने नकार दिल्यानंतर शिवाने त्याला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. (Murder of a youth for not paying Rs 100 for liquor; Come with scissors on the neck)
महेंद्रने शिवाला दोन-तीन कानाखाली लावल्या. दरम्यान, शिवा घटनास्थळावरून पळून गेला आणि हातात कात्री घेऊन परत आला. येताच त्याने महेंद्रच्या गळ्यात कात्रीने वार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. कुटुंबीयांनी प्रथम महेंद्रला स्थानिक रुग्णालयात नेले, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मेरठला नेण्यात आले. मेरठच्या रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी महेंद्रला मृत घोषित केले.
महेंद्रचा मुलगा अमन याच्या तक्रारीवरून बेगमाबाद येथील रहिवासी शिवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आरोपींना अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेली कात्री जप्त करण्यात आली आहे.
महेंद्रचा जीव वाचू शकला असता-
दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी शिवाने महेंद्रला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवाने शिवीगाळ सुरू केल्यावर महेंद्र त्याच्या घरात गेला. दरम्यान शिवाने महेंद्रच्या घरावर वीट फेकली. यानंतर महेंद्र घरातून बाहेर आला आणि त्याने शिवाला दोन-तीन कानाखाली मारल्या. या दोघांचं भांडण कॉलनीतील लोक प्रेक्षक बनून पाहत होते. परंतु कोणीही भांडण सोडवण्यासाठी आलं नाही. महेंद्रच्या कमाईतूनच कुटुंबाचा खर्च भागत असल्याचे कॉलनीतील लोकांनी सांगितले. आता या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.