Akshaya Tritiya 2023 esakal
संस्कृती

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे अन् काय करू नये? वाचा आध्यात्मिक फायदे

अक्षय्य तृतीयेला नेमक्या कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये ते जाणून घेऊयात

सकाळ डिजिटल टीम

Akshaya Tritiya 2023 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे. या दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतता. कारण या दिवशी सोने खरेदी करणे फार शुभ मानले जाते. तर अनेक लोक या दिवशी दान धर्मही करतात. मात्र अक्षय्य तृतीयेला नेमक्या कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये ते जाणून घेऊयात.

अक्षय्य तृतीयेबाबत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात

  • अक्षय्य तृतीया हा केवळ हिंदू धर्माचाच नाही तर जैन धर्माचा देखील वार्षिक वसंत ऋतू उत्सव आहे.

  • अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी सोन खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी नांदते.

  • हा दिवस भगवान परशुरामाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. श्री परशुरा हे श्री विष्णूंचा सहावा अवतार आहेत. तसेच या दिवशी वेद व्यासांनी महाभारत लिहीण्यास सुरुवात केली होती.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही कामं आवर्जून करा

१) सोने खरेदी करा - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करायची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे तसेच संपत्तीचेसुद्धा प्रतिक आहे.

२) नवीन उद्योग सुरु करा - तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा कंपनी सुरु करायची असेल तर अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त फार शुभ मानला जातो. या दिवशी उद्योग सुरु केल्या कायम उद्योग किंवा कंपनीच्या नफ्यात भरभराट होते. (Astrology)

३) वाहने खरेदी करा - तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय्य तृतीया हा दिवस उत्तम आहे. या दिवशी वाहन खरेदी करणे हे दीर्घायुष्याचे प्रतिक मानल्या जाते. तसेच अनेक कार आणि

४) नवे घर खरेदी करा - अक्षय तृतीया हा नवीन घर विकत घेण्यासाठी उत्तम काळ आहे. गृहप्रवेशासाठी हा मुहूर्त अगदी उत्तम मानला जातो. या दिवशी घरात सकारात्मक उर्जा संचारते. या दिवशी घर खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धीचा कायम वास असतो.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : अटक वॉरंट चावून खाण्याचा प्रयत्न, चिमुकल्याला टेबलावर आपटण्याची धमकी! म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताच्या पत्नीचा धिंगाणा

Dhurandhar Bade Sahab : धुरंधर चित्रपटातील 'बडे साहब' कोण? आदित्य धर स्वतःच म्हणाले ती व्यक्ती म्हणजे...

Latest Marathi News Live Update: पेणमधील स्ट्राँगरूममध्ये उंदरांचा शिरकाव, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल

Nashik Leopard : गडकरी चौकात बिबट्याचे दर्शन होऊन २४ तास उलटले; भरवस्तीतून बिबट्या गेला कुठे? नाशिकमध्ये भीतीचे वातावरण

Budha Gochar 2025: 'या' राशीच्या लोकांचा 20 डिसेंबरपासून बदलेले लक, बिझनेसमध्ये नफा अन् प्रमोशनचे जुळून येतील योग

SCROLL FOR NEXT