Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : आजार बरा होण्याचं नावचं घेत नाहीये? स्मशानभूमीतले हे उपाय करतील मदत

ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार स्मशानभूमीच्या मातीमध्ये खूप शक्ती असते

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : घरात आजारपण वाढतेच आहे? कितीही औषधं घेतले कितीही ट्रीटमेंट केली तरीही आजार बरा होत नाहीये? मग स्मशानभूमी संबंधित हे उपाय करा. हे उपाय केल्याने तुम्ही आधीसारखेच बरे व्हाल.

स्मशानभूमीत जाऊन हे उपाय करणे काही तोंडाचा खेळ नाही; अनेकांना हे वाचूनक भीती वाटत असेल, पण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी त्यांच्या चांगल्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो असेच काहीसे हे उपाय आहेत.

कोणतीही व्यक्ती आजारी पडणे ही सामान्य गोष्ट आहे, पण जर हा आजार बराच काळ सुरू असेल आणि तो बरा होण्याचा कोणताही मार्ग नसेल, तर वैद्यकीय उपचारांसोबतच एखादा ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणे चुकीचे नाही.

अर्थात हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग असला तरीही आपली जवळची व्यक्ती असेल तर तिला वाचवायला आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो. अनेक वेळा असे घडते की व्यक्तीचा आजार इतका गंभीर नसतो किंवा तो उपचाराने बरा होत असतो. पण तरीही ग्रह किंवा इतर कारणांमुळे औषधाचा प्रभाव थांबलेला दिसतो.

तंत्रशास्त्र काय सांगते?

ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार स्मशानभूमीच्या मातीमध्ये खूप शक्ती असते कारण या मातीवर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे, विचारसरणीचे व्यक्ती दहन केले जाते. त्यामुळे असे म्हणतात की स्मशानभूमीच्या मातीमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात. अशा वेळी या मातीशी संबंधित काही उपाय केले तर त्यातील सकारात्मक शक्ती माणसाला पुन्हा निरोगी बनवण्यास मदत करते.

स्मशानभूमीचे उपाय

त्रासांपासून मुक्त होण्यासाठी

जर संकटे तुमची साथ सोडत नसतील आणि तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या संकटाने घेरले असेल तर स्मशानभूमीत 1 रुपयाची नाणी पसरवा.

ही नाणी पासरवतांना भगवंताचे नामस्मरण करा; याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीकडे आपले लक्ष असू नये हे लक्षात ठेवा.

रोगांपासून मुक्त होण्यासाठी

जर तुमच्या घरात कोणी गंभीर आजारी असेल आणि औषधांनी काम करणे बंद केले असेल तर रात्रीच्या वेळी रुग्णाच्या डोक्यावर तांब्याचे नाणे ठेवा. त्यानंतर ते नाणे दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत फेकून द्या. यामुळे औषधाचा परिणाम दिसून येईल आणि रुग्णाची लवकरच या आजारातून सुटका होईल.

चंद्राच्या अशुभतेसाठी

ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र जर अशुभ दिशेत किंवा वक्री असेल तर व्यक्तीला अनेक त्रास सहन करावे लागतात. अशा वेळी मातीच्या भांड्यात अंत्यसंस्काराचे पाणी आणून त्यात चांदीचा चौकोनी तुकडा ठेवावा. यानंतर हे भांडे घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. लहान मूल किंवा इतर कोणीही त्याला हात लावणार नाही याची काळजी घ्या. असे मानले जाते की या उपायाने आर्थिक संकट दूर होते आणि कामातील अडथळे देखील आपोआप दूर होतात.

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT