job astro news
job astro news esakal
संस्कृती

Astro Tips : नोकरीत प्रगती हवी आहे? करा हे उपाय

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : आपल्या सगळ्यांना आयुष्यात खूप प्रगती हवी असते. चांगली नोकरी मिळावी किंवा व्यवसायात प्रगती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक खूप मेहनत घेतात. काही लोकांना थोड्याशा मेहनतीतही यश मिळते, पण काही लोक असे असतात ज्यांना खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. मेहनत करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही ज्योतिषाची मदत घेऊ शकता. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत.

1. शनीला शक्तिशाली बनवा

ज्योतिष शास्त्रानुसार शनि हा ग्रह कर्माचा दाता आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रहाची वक्री असेल तर त्याला कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शनि ग्रहाच्या शांतीसाठी उपाय करावेत. यासाठी शनिवारी उपवास करून काळे तीळ आणि मोहरीच्या तेल शनी मंदिरात दान करा.

2. घरात नवग्रह शांती करा.

जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा. याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील.

3. सूर्यदेवाची पूजा करा

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात उच्च पद आणि नेतृत्व प्राप्तीचा कारक मानला जातो. सूर्य ग्रहाची उपासना करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकता. यासाठी दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाण्याचे अर्घ्य द्यावे.

4. फेंगशुई तत्त्वे वापरा

चायनीज वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवलेल्या वस्तू तुमची प्रगती दर्शवतात. अशा परिस्थितीत कार्यालयात फिश टँक आणि वेगवेगळ्या रंगांचे मासे ठेवा. भिंतीवर निळे किंवा काळे चित्र देखील लावा.

5. भगवान शंकराला काळे तीळ अर्पण करा

जर तुम्हाला नोकरीत अडथळे येत असतील तर पाण्यात काळे तीळ भिजवून प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी शिवलिंगावर अर्पण करा. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की या उपायाने तुमच्या सर्व समस्या लवकर दूर होतात.

Disclaimer: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. या गोष्टींसाठी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Today: जागतिक बाजारात जोरदार तेजी; आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Amit Shah on Kejriwal's bails: 'केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाली...', जामिनावर अमित शाहांचा हल्लाबोल

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Latest Marathi News Live Update : निवडणूक ड्युटीवर असलेल्या ५० जवानांना घेऊन जाणारी बस पलटली

SCROLL FOR NEXT