Dhanteras 2022
Dhanteras 2022  esakal
संस्कृती

Dhanteras 2022 : आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीच्या पूजेचे काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Scientific and Pauranic reson behind Dhanvantari Pooja : आज धनत्रयोदशी आहे. दिवाळीचा दुसरा दिवस. हिंदू धर्मातल्या या सर्वात मोठ्या सणाला फार महत्व आहे. कारण सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक घटकाला, भावनेला आणि नात्याला जपणारा हा सण आहे.

धनत्रयोदशी या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी धन्वंतरी पूजा केली जाते अशी मान्यता आहे. शिवाय चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. पण धन्वंतरीचे पूजन का केले जाते? तज्ज्ञांच्या मते त्या मागचं शास्त्रिय कारण काय हे माहितीये? चला जाणून घेऊया.

शास्त्रिय कारण

दिवाळीचा काळ हा ऋतूमानानुसार संक्रमणाचा काळ समजला जातो. याकाळात पावसाळा संपून हिवाळ्याची सुरूवात झालेली असते. पावसाळ्यात आद्रतेने अनेक जीव जंतू, आजार यांचा प्रदूर्भाव वाढलेला असतो. त्यात हिवाळ्याची सुरूवात होते. या संक्रमणाच्या काळात शरीराला हा बदल स्वीकारायला वेळ लागतो.

मग संसर्गजन्य आजार, सर्दी, खोकला यांचा ताप वाढलेला असताना आयुर्वेदशास्त्र उपयोगाला येतं. त्याचं महत्व पटवून देणारा हा सण आहे. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे त्यासाठी पूजन केलं जातं असं तज्ज्ञ मानतात.

धन्वंतरीबाबत काही मान्यता

पौराणिक मान्यतांनुसार, देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. पुराणातील काही उल्लेखांनुसार, धन्वंतरी हे श्रीविष्णूंचे अंशावतार मानले गेले आहे.

अश्विन कृष्ण त्रयोदशी हा धन्वंतरी जन्म मानला गेल्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. तिन्हीसांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे.

धन्वंतरीची जन्मकथा

समुद्र मंथनाबाबतचे उल्लेख श्रीमद्भागवत पुराण, महाभारत, विष्णु पुराण, अग्नि पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथात आढळून येतात. अन्य एका कथेनुसार, काशीचे राजवंशज धन्व नामक राजा अज्ज देवांचे उपासक होते. अज्ज देवांना प्रसन्न करून घेतले.

वरदान स्वरुपात धन्वंतरी नामक पुत्राची त्यांना प्राप्ती झाली, असे सांगितले जाते. या कथेचा उल्लेख ब्रह्म पुराणात आढळून येतो. समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या धन्वंतरी तो दुसरा जन्म होता, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT