Gudhi Padwa 2023  esakal
संस्कृती

Gudhi Padwa 2024 : छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून गुढी उभारली जातेय? काय आहे सत्य

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा काय संबंध?

सकाळ डिजिटल टीम

गुढी पाडवा हा आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून या सणाला हिंदू नववर्ष असे देखील म्हणतात.

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन आणि शुभ कार्ये केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात. आपल्या दारात उभारलेली गुढी हि समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते. पण गेल्या काही वर्षांपासून गुढी पाडव्याबद्दल काही संदेश सोशल मिडीयावर पसरवले जात आहेत. गुढी पाडवा आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबद्दलचे हे संदेश आहेत.

छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर आनंदोत्सव म्हणून स्वराज्यातील एका विशिष्ट समाजातील लोकांनी गुढी पाडवा साजरा केला. असा मतितार्थ त्या संदेशात असतो. याही वर्षी सकाळपासून असे संदेश व्हायरल होत आहेत. पण, हे खरं आहे का? राजे संभाजी यांच्या मृत्यूनंतर गुढी पाडव्याला सुरूवात झालीय का? कि त्याआधीपासून गुढी उभारली जात होती. याबद्दल जाणून घेऊयात.

पाडव्याबद्दल पौराणिक महात्म्य असं सांगितलं जातं की, ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्री राम देखील आपल्या राज्यात वनवास संपवून आले असे सांगितले जाते. हा गुढी पाडवा सण जसा महाराष्ट्रात मराठी माणूस साजरा करतो तसेच कानडी आणि तेलगू मंडळी देखील साजरा करतात.

गुढी पाडव्याचा उल्लेख आपल्याला संभाजी राजांच्या मृत्यूआधीही सापडतो. २४ नोव्हेंबर १६४९ सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे. या पत्रात एक मजकूर सापडतो. त्यात गुढी पाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

म्हणजेच शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता. इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने, या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले. आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात गुढी पाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो.

या सोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे कि गुढी पाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते. हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे.

हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढी पाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. हे तर आपण पहिले कि शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे.

आता पाहूया कि शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता कि नाही. आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांच्या ओळी आहेत.

संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय ४/६/१४ मधील ओळींत आणि अनेक ठिकाणी ‘विजयाची गुढी’ व असे अनेक गुढी पाडव्याचे उल्लेख, गुढी पाडवा हा सण त्याही काळात होता याचे पुरावे देतात. आपल्या खात्रीसाठी आपण त्यातील एक श्लोक पाहू.

एकें संन्यासी तोचि योगी। ऐसी एकवाक्यतेची जगीं। गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरीं।।

संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात.

संत तुकाराम देखील आपल्या अभंगात म्हणतात,पुढे पाठविले गोविंदे गोपाळा। चपळा हाती गुढी।।

यावरून तुकाराम महाराजांना देखील हा सण माहित होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT