Astro Tips - Ganesh Mantra  esakal
संस्कृती

Astro Tips : कामात प्रगती अन् नोकरीत बढती हवी आहे? या ५ मंत्रांनी करा श्री गणेशाची स्तुती...

करियरमध्ये प्रगती हवी असेल, पगारात वाढ हवी असेल तर या मंत्राचा जप करुनच घराबाहेर पडा...

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips Ganesh Mantra : हिंदू धर्मात कोणत्याही कामाआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. असे म्हणतात की, श्रीगणेशाची पूजा केल्याने प्रत्येक शुभ कामात यश मिळते. श्रीगणेशाची पूजा करताना या ५ मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर मानले जाते.

अशात घराबाहेर पडण्याआधी श्री गणेशाची स्तूती करणे खूप फायद्याचे असते. जर तुमचे कोणते काम होत नसेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल, करियरमध्ये प्रगती हवी असेल, पगारात वाढ हवी असेल तर या मंत्राचा जप करुनच घराबाहेर पडा.

१. वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।

निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा॥

गणपतीचा हा मंत्र सर्वाधिक लोकप्रिय आहे. म्हणजे ज्याची सोंड वक्र आहे, ज्याचे शरीर विशाल आहे, ज्याचे तेज करोडो सूर्यासारखे आहे, अशा देवता माझी सर्व कार्ये कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ द्या.

२. एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं।

विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥

तुषारांनी शोभलेल्या, विशाल शरीर असलेला आणि जो विघ्नांचा नाश करणारा आहे अशा दिव्य भगवान हेरंबांना मी प्रणाम करतो.

३. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।

नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

या मंत्रात नमूद केलं आहे की, ज्याला एक दात (एकदंताय) आहे, सुंदर चेहरा आहे, जो त्याचा आश्रय घेणाऱ्या भक्तांचे रक्षण करतो, जो सर्व प्राणिमात्रांचे दुःख हरण करतो, त्याला आम्ही नमन करतो.

४. ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये।

वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।

या मंत्राचा अर्थ आहे हे श्री गणेशा तुमच्या मुळे हा जन्म मिळाला आहे. अशीच तुमची कृपा माझ्यावरती कायम असुदेत.

५. ॐ गं गणपतये नमः।।

हा सर्वात प्रभावी मंत्र म्हटला जातो, हा मंत्र आपण कुठेही म्हटला तरी चालतो, या मंत्राचा नियमित जप फार प्रभावी असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein Files उघड! फोटो सोडा... १८ अन् १९ सेकंदाचा व्हिडिओ देखील व्हायरल, बेडरूम, स्नानगृह अन् रहस्यमय खोली...

Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघात

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT