1993 Mumbai Blasts टिम ई सकाळ
देश

Mumbai 1993 Bomb Blast : स्वप्न नगरीला हादरवून सोडणारं भयावह सत्य

१९९३ च्या बॉम्बस्फोट हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

१२ मार्च हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस म्हणावा लागेल. कारण आजच्याच दिवशी १२ मार्च १९९३ ला मुंबईत १२ ब्लास्ट झाले होते. संपुर्ण देशाला हादरुन देणारा हा दिवस होता. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल. या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर सातशे पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात. यात विशेष म्हणजे ईडीने अटक केलेल्या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा संबंध १९९३ च्या बॉम्बस्फोटमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे १९९३चे बॉम्बस्फोट प्रकरण पुन्हा नव्याने उघडण्याची शक्यता आहे.

१२ मार्च १९९३ काय झालं होतं?

१२ मार्चला मुंबईत १२ स्फोट झाले.
१२ मार्चला दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. स्फोट झालेल्या ठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते.

दुसरा स्फोट : दुपारी २.१५ वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट : दुपारी २.३० वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट : दुपारी २.३३ वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट : दुपारी २.४५ वाजता, सेंच्युरी बाजार
सहावा स्फोट : दुपारी २.४५ वाजता, माहिम
सातवा स्फोट : दुपारी ३.०५ वाजता, झवेरी बाजार
आठवा स्फोट : दुपारी ३.१० वाजता, सी रॉक हॉटेल
नववा स्फोट : दुपारी ३.१३ वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट : दुपारी ३.२० वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी ३.३० वाजता, सहार विमानतळ
बारावा स्फोट : दुपारी ३.४० वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल

या स्फोटातील एक दोषी याकूब मेमन याला नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकवले तर स्फोटाचा मुख्यसूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असून तो अद्याप फरार आहे.

१९९३ चा बॉम्बस्फोट आणि नवाब मलिक

नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने त्यांच्या घरी २३ फेब्रुवारीच्या पहाटे साडे सहाच्या सुमारास छापा टाकला होता. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. मलिकांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं होतं. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याचं समोर आलंय.

मलिकांवर नेमके आरोप काय? -

नवाब मलिकांनी दाऊदशी संबंधित माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर ईडीने अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर २३ फेब्रुवारीच्या सकाळीच मलिकांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. ईडीने मलिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने मलिकांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT