Kanika-Kapoor 
देश

Coronavirus : कनिकामुळे अख्ख्या अपार्टमेंटची करावी लागली कोरोना टेस्ट!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका 'बेबी डॉल' फेम कनिका कपूर ही सध्या कोरोना व्हायरसने ग्रस्त असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लंडनहून परतल्यानंतर तिने कोणतीही तपासणी केली नव्हती. तिच्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तिच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट करण्यास सुरवात झाली आहे. 

त्यामुळेच कनिका राहत असलेल्या अपार्टमेंटमधील सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आहे. १३ मार्चला कल्पना टॉवरमध्ये कनिका राहायला आली होती. या दरम्यान ती एका पार्टीतही सहभागी झाली होती. ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये ३५ लोक राहत असून त्या सर्वांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. तर इतर २४ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. 

लंडनहून परतल्यानंतर कनिकाने तपासणी करून होम क्वॉरन्टाईन करून घ्यायला पाहिजे होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, ती आई-वडिलांना भेटली. त्यानंतर लखनऊ येथील ताज हॉटेलमध्ये राहिली. त्यानंतर आदेश शेठ यांनी आयोजित केलेल्या एका पार्टीतही तिने उपस्थिती लावली होती. या पार्टीला वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी आता स्वत:ला होम क्वॉरन्टाइन करून घेतलं आहे. 

कनिकाला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर आणि तिचा हा हलगर्जीपणा समोर आल्यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. निष्काळजीपणाने वागल्याबद्दल तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. आतापर्यंत १६२ लोक कनिकाच्या संपर्कात आले होते. त्यापैकी ६३ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, बेजबाबदार वागणुकीमुळे कनिकाविरोधात उत्तर प्रदेशातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक, साेलापुतील चौकाचौकांत उभारले बॅनर!

Minister Mkarand Patil: महाराष्ट्राच्या कामाचा माणूस...

SCROLL FOR NEXT