देश

प्रियकरासमोर मुलीलाही करायची नग्न; व्हिडीओ कॉलवरचं 'ते' कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद

महिलेच्या लाजिरवाण्या कृत्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आई आणि मुलगी हे अतिशय पवित्र नातं. परंतु या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेच्या लाजिरवाण्या कृत्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे आला आहे. गाजियाबादमधील एक महिला तिच्या प्रियकरासमोर व्हिडिओ कॉलवर नग्न व्हायची. पतीला संशय आल्याने त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असता पत्नीचे खरं रुप समोर आले. विशेष म्हणजे प्रियकर घरी आल्यानंतर त्याच्यासमोर या महिलेने स्वतःसोबत आपल्या 13 वर्षांच्या मुलीलाही नग्न केले असल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आक्षेपार्ह दृश्य पाहिल्यानंतर पतीने पत्नी आणि प्रियकरावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (A mother used to strip her daughter naked in front of her lover)

हा धक्कादायक प्रकार कवीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. येथे एक व्यक्ती आपल्या कुटूंबासोबत राहते. त्याच्या कुटूंबात पत्नी, मुलगा आणि दोन मुली आहेत. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच्या गैरहजेरीत कोणीतरी घरात येत असल्याची माहितीही त्याला त्याच्या मुलाकडून आणि आजूबाजूच्या काही लोकांकडून मिळत होती. पत्नीच्या या कृत्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी तरुणाने ऑक्टोबरमध्ये शांतपणे आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि मोबाईलद्वारे थेट फुटेज पाहिल्यानंतर पत्नीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.

घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने व्यक्तीला पत्नीच्या या कृत्याची माहिती मिळाली. त्याने आपल्या मुलीशी याबाबत बोलणे केल्यावर मुलगीने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. आईने जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या भीतीने आपण कोणालाही काहीही सांगितले नसल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. याबाबत पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराशी चर्चा केली असता आपली चूक मान्य करण्याऐवजी दोघांनी त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली, असाही आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे.

महिलेचे कृत्य पाहून पोलिसही अचंबित :

दोन दिवसांपूर्वी पतीने कविनगर पोलीस ठाण्याच्या (Police Station) पोलिसांना व्हिडीओ फुटेजची माहिती दिल्यावर पोलिसही थक्क झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्नी अर्धनग्न अवस्थेत तिच्या प्रियकराशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत होती. त्याच वेळी, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिची 13 वर्षांची मुलगी नग्न अवस्थेत असल्याचं दिसलं आणि महिलेचा प्रियकर तिला अयोग्यरित्या स्पर्श करत असल्याचे दिसलं. प्रियकराच्या या कृत्याला महिलेने आक्षेप घेतला नाही.

मेसेंजरवर करायचे कॉल-

पतीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत मेसेंजरवर व्हिडिओ कॉल करत असे. कॅमेरा फुटेजच्या 40 दिवस आधी या तरुणाला पत्नीच्या कारनाम्याची माहिती मिळाली. पत्नी आणि तिच्या प्रियकरापासून जीवाला धोका असल्याचे पतीने म्हटले आहे. दोघांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.

महिलेवर गुन्हा दाखल-

पतीने महिला आणि तिचा प्रियकर अनुजविरुद्ध विनयभंग, पॉक्सो कायदा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने पत्नी घर सोडून कुठेतरी निघून गेली आहे. पतीने व्हिडिओ फुटेज पोलिसांना दिले आहे. त्याआधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे कवीनगर पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रिक्षावाल्या लेकाची माय! आईनं सांगितली पोराच्या प्रेमाची कहाणी; औषधाला पैसे नसतात तेव्हा...

'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यातील मनसेचे चार जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षात

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

SCROLL FOR NEXT