amarnath-yatra-attack-muslim-bus-driver-saleem-sheikh-saved-devotees 
देश

ड्रायव्हर सलीम शेख ठरला अमरनाथ यात्रेकरूंसाठी हिरो

वृत्तसंस्था

जम्मू - अमरनाथ यात्रेदरम्यान अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य बनविलेल्या बसचा चालक सलीम शेख बसमधील सुमारे 50 भाविकांचा जीव वाचविल्याने हिरो ठरला आहे. मात्र, सात जणांचा जीव वाचवू न शकल्याची खंत त्याला आहे. 

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेली बस गुजरातमधील वलसाड येथील ओम ट्रॅव्हल्स कंपनीची होती. चालक सलीम शेख अमरनाथ येथून भाविकांना घेऊन कटराकडे जात होता. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या गोळीबाराचा आवाज ऐकून बसमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, त्या परिस्थितीतही सलीमने धाडस दाखवत बस न थांबविता वेगात नेली. बस थांबविली असती तर दहशतवाद्यांना बसमधील प्रवाशांना लक्ष्य करणे सोपे झाले असते. दहशतवाद्यांची एक गोळी बसच्या टायरला लागली तरीही सलीमने बस न थांबवता तशीच पळवत लष्कराच्या कॅम्पपर्यंत नेली. सलीमने आपला जीव धोक्यात बसमधील सर्व प्रवाशांचा जीव वाचविला. त्यामुळे सलीमच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दहशतवाद्यांचे लक्ष्य बसमधील प्रवासी नसून, सुरक्षा रक्षक असल्याचे म्हटले आहे. सुरक्षेबाबत काही अंशी ढीलाई झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Suryakumar Yadav: कान बंद करणे सोपे, अंमलबजावणी कठीण; सूर्यकुमार, कधी कधी चांगला सल्लाही ठरतो उपयोगी

Kolhapur Crime : आठवर्षीय चिमुकलीचा दुर्गावतार, स्वत:च्या अपहरणाचा हाणून पाडला प्रयत्न; कोल्हापुरातील नांदणीमध्ये थरारक घटना

Pune Weather: पुण्यात पावसाने घेतली दोन दिवसांची विश्रांती; पुढील दोन दिवसांत पुन्हा हलक्या सरींचा अंदाज

Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; पायक्रॉफ्ट सामनाधिकारी म्हणून कायम राहणार?

SCROLL FOR NEXT