UP CM Yogi Adityanath esakal
देश

Ram Temple : अयोध्येतील राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर; CM योगींनी दिली महत्वाची माहिती

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचं काम पुढं नेलं आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचं काम पुढं नेलं आहे.'

आचार्य धर्मेंद्र (Acharya Dharmendra) यांचा पराक्रम खूप मोठा आहे. देशाची जुनी आणि धार्मिक परंपरा त्यांनी पुढं नेलीय. आचार्य धर्मेंद्र यांनी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली राम मंदिर आंदोलनाला मोठी चालना दिली. धर्मेंद्रांनी 50 वर्षे हिंदू समाजाचं सांस्कृतिक चळवळीत नेतृत्व केलं, असं स्पष्ट मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी व्यक्त केलं.

योगी आदित्यनाथ गुरुवारी आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी कार्यक्रमात बोलत होते. योगी म्हणाले, देशाची फाळणी झाली, तेव्हा संतांच्या आंदोलनात या खंडपीठाची मोठी भूमिका होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचं काम पुढं नेलं आहे. राम मंदिराचं (Ram Temple Ayodhya) काम 50 टक्के पूर्ण झाल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

स्वामी विवेकानंदांनी ज्या प्रकारे समर्थ रामदासांची परंपरा पुढं नेली, त्याच पद्धतीनं स्वामी सोमेंद्र आता आचार्य धर्मेंद्र यांची परंपरा पुढं नेत आहेत. आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी सोहळ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली होती. योगी आदित्यनाथ आणि खासदार बाबा बालकनाथ सकाळी 10.40 वाजता लखनौहून हेलिकॉप्टरनं जयपूर जिल्ह्यातील विराटनगर शहरामधील पंचखंड हनुमान मंदिर (भीम डुंगरी) जवळील हेलिपॅडवर उतरले. येथून पंचखंड हनुमान मंदिरात ते पोहोचले. यावेळी त्यांनी 15 मिनिटं सभेला संबोधित केलं. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मंचावर अल्वरचे खासदार महंत बालकनाथ उपस्थित होते.

कोण होते आचार्य धर्मेंद्र?

महात्मा रामचंद्र वीर महाराज यांचे पुत्र आचार्य धर्मेंद्र हे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळात राहिले आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य हिंदी, हिंदुत्व आणि हिंदुस्थानच्या वाढीसाठी वाहून घेतलं होतं. आचार्य यांचा जन्म 9 जानेवारी 1942 रोजी मालवाडा, गुजरात इथं झाला. वडील महात्मा रामचंद्र वीर महाराज यांच्या आदर्शांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी वज्रांग नावाचं वृत्तपत्र काढलं. बाबरी विध्वंस प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती यांच्यासह आचार्य धर्मेंद्र यांनाही आरोपी मानलं गेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT