DK Shivakumar Siddaramaiah esakal
देश

Belgaum Election : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित होताच 'या' आमदारांत मंत्रिपदासाठी लागली चुरस

आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून, त्यात जिल्ह्यातून मोठ्या स्वरूपात रस्सीखेच सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : विधानसभा निवडणुकीचा (Belgaum Assembly Election) निकाल घोषित होऊन पाच दिवस लोटल्यानंतर अखेर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात आला असून, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्याकडे परत एकदा जबाबदारी सोपविली आहे.

आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून, त्यात जिल्ह्यातून मोठ्या स्वरूपात रस्सीखेच सुरू आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील (Belgaum) लिंगायत आमदारांत (Lingayat MLA) अधिक चुरस आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जिल्ह्यात ११ जागा मिळाल्या.

त्यापैकी ‘केपीसीसी’चे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, प्रकाश हुक्केरी आणि अशोक पट्टण यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी सतीश यांना मंत्रिपद नक्की मानले जात आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांतर्फे उपमुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सात लिंगायत, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, एक मुस्लिम, एक ब्राह्मण असे मिळून ११ कॉंग्रेस उमेदवार निवडून आले आहेत.

यापैकी पाच जणांमध्ये मंत्रीपदासाठी चुरस आहे. लक्ष्मण सवदी, लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, प्रकाश हुक्केरी व अशोक पट्टण अशी त्यांचा नावे आहेत. भाजप उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्यावर मात करण्यासह कुडची आणि कागवाड येथून कॉंग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये सवदी यांचे पात्र खूप महत्वाचे ठरले. त्यासाठी त्यांचे नाव मंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार मानले जाते.

आमदार जारकीहोळी यांचे तगडे आव्हान पेलत बेळगाव ग्रामीणमध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजय मिळवले आहे. त्यांना महिला गोटातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. चिक्कोडीमध्ये प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार रमेश कत्ती यांचा ७८ हजार ५०९ मताधिक्यांनी पराभव करून एकतर्फी विजय मिळविलेले गणेश हुक्केरी, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.

सिध्दरामय्यांचे निकटवर्तीय अशोक पट्टण (रामदूर्ग) व महांतेश कौजलगी (बैलहोंगल) यांनी विजय मिळविला आहे. या दोघांकडून मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे ११ पैकी पाच जणांमध्ये चुरस आहे.

जिल्ह्यात तिघांना मिळावे मंत्रिपद

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश यांनी बेळगाव जिल्हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. यामुळे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळायला हवीत, अशी मागणी केली आहे. भाजप सरकारमध्ये जिल्ह्यात चौघांना मंत्रिपदे देण्यात आली होती. त्या धर्तीवर जिल्ह्यासाठी मंत्रिपदाची मागणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Thane Rain Traffic : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा जोर; पुढील २४ तास महत्त्वाचे, वाहतूक कोंडीची काय आहे स्थिती?

Ben Stokes Century: निवृत्तीनंतरही बेन स्टोक्सचा जलवा; १२ वर्षानंतर संघात परतला अन् पहिल्याच सामन्यात वादळी शतक ठोकले

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांची महाराष्ट्रातील नेते भेट घेणार

MHADA Pune: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाच्या ताथवडे प्रकल्पातील ६३४ फ्लॅट्सची दुसरी सोडत जाहीर

Vidarbha Rain: विदर्भात पावसाला सुरवात, बळीराजा सुखावला; पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा, अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना वेग

SCROLL FOR NEXT