Beti Bachao Beti Padhao esakal
देश

Beti Bachao Beti Padhao : तिने खऱ्या अर्थाने ‘बेटी बचाओ, बेटी बचाओ’ अभियान राबवले!

एका मातेने तिच्या मुलीसाठी जे काही केल ते ऐकून तूम्हाला तिचा अभिमान वाटेल.

सकाळ डिजिटल टीम

भारतात एककाळ असा होता जेव्हा मुलींचा जन्म होण्याआधीच त्यांना मारले जायचे. कारण, घरात मुलगी जन्मली म्हणजे खर्च वाढला, तिचे लग्न हुंडा यामुळे मुलगी नकोशी होती. पण, कालांतराने हि परिस्थिती बदलली आणि देशात मुलींची संख्या वाढलीय.

मुलींच्या जन्माबरोबरच त्यांच्या शिक्षणाचीही दयनिय अवस्था होती. कारण, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतील पण मुलीसाठी खिसा मोकळा होत नाही. अशी परिस्थिती असताना एका मातेने तिच्या मुलीसाठी जे काही केल ते ऐकून तूम्हाला तिचा अभिमान वाटेल.

मुलाचे संगोपन चांगले व्हावे म्हणून एक आई कुठेही कमी पडत नाहीत. सध्या 57 वर्षीय एस. पेटचियाम्मलयांच्याकडे पाहुन त्याचीच प्रचिती येते. तिच्या आयुष्याचा मार्ग बदलला आहे. पेटचियाम्मल 20 वर्षांच्या असतानाच त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याहुन वाईट गोष्ट म्हणजे त्यावेळी त्या दोघांच्या लग्नाला केवळ पंधरा दिवस झाले होते.

एस. पेटचियाम्मल एका अशा गावात राहत होत्या. जिथे पुरुषप्रधान संस्कृती अबाधित आहे. त्यावेळी पेटचियाम्मल यांच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न असा होता की, जगायचं कसं. कारण, एका विधवेच्या वाट्याला काय येत हे त्यांनी ऐकलं आहे. त्यामूळे पुरूषप्रधान संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्या समाजात एका स्त्रीने जगण्यासाठी दिलेला हा अनोखा लढा आहे.

तामिळनाडू येथील रहिवासी असलेल्या एस पेटचियाम्मल यांनी ३६ वर्षांपासून आपली ओळख लपवून ठेवली होती. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी ३६ वर्ष एक महिला असल्याची ओळख लपवून ठेवली. मुलीचे संगोपन चांगल्यारितीने करता यावे असा त्यांचा उद्देश होता.

३६ वर्षानंतर आता एस पेटचियाम्मल यांनी त्यांची हि संघर्ष कथा शेअर केली आहे. कटुनायक्कनपट्टी गावातील रहणाऱ्या एस पेटचीअम्मल यांनी पतीच्या निधनानंतर नऊ महिन्यात एका मुलीला जन्म दिला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काम करायला सुरूवात केली. पण पुरुषप्रधान समाज असल्याने गावातील लोकांनी तिचा छळ केला. त्यामुळे नाईलाजाने त्यांना पुरूषाचे वेषांतर करावे लागले. केवळ कपडेच नाही तर केस आणि नावही त्यांनी बदलले. पुरूष बनल्यावर त्यांनी 'मुथू'हे नाव लावले.

एस पेटचियाम्मल यांनी महिला म्हणून बांधकाम साइट्स, हॉटेल्स आणि चहाच्या स्टॉल्सवर काम केले. या ठिकाणी पुरूषांची मक्तेदारी होती. जिथे त्यांना छळ, लैंगिक अत्याचार आणि टोमणे यांचा सामना करावा लागला. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिरुचेंदूर मुरुगन मंदिरात जाऊन केशवपन केले. तिथेच त्यांनी शर्ट आणि लुंगी घातली. तोच त्यांचा कायमचा पोषाख बनला.

केवळ माझ्या जवळच्या नातेवाईकांना आणि मुलीला हे सत्य माहिती आहे. पेटचियाम्मल यांनी चित्रकार, चहा विक्रेता,पराठा विक्रेता अशा सर्व प्रकारच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे कमावले.

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि बँक खात्यावर त्यांचे नवीन नाव 'मुथू' चिकटवले. पेटचियाम्मल यांची मुलगी शनमुगासुन्दरी हिचे आता लग्न झाले आहे. आणि मुथू आता 57 वर्षाच्या झाल्या आहेत.

एका मातेने मुलीच्या भविष्यासाठी केलेला संघर्ष नक्कीच सिंगल मदर असलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. खरतर पतीच्या निधनानंतर त्यांनी गर्भपात करून दुसरे लग्न केले असते. पण, त्यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला आणि तिला योग्य शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. भारत सरकारने राबवलेले ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, हे अभियान यशस्वीपणे पेलले आहे हेच दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

Body Impact Less Sleep: तुम्हीही रात्री फक्त 2 तास झोपताय? जाणून घ्या शरीरावर काय परिणाम होतात

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT