Kalicharan
Kalicharan Kalicharan
देश

तीन महिन्यानंतर कालीचरण महाराजला दिलासा, जामीन मंजूर

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगडच्या रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींबाबत अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला (Kalicharan Maharaj) आज जामीन मिळाले. जवळपास तीन महिन्यानंतर बिलासपूर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केले. न्यायामूर्ती अरविंदसिंह चंदेल यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी झाली. या दरम्यान दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी आपापले म्हणणे मांडले. सरकारी वकिलाने जामीनाला विरोध केला. ते म्हणाले, कालीचरण महाराजला त्यांनी केलेल्या कृत्याचे पश्चाताप नाही. (Bilaspur High Court Grant Bail To Kalicharan Maharaj)

त्यामुळे ते तुरुंगाच्या बाहेर आल्यानंतरही पुन्हा द्वेष पसरवू शकतात. दुसरीकडे महाराजाच्या वकिलाने जामीन मिळावी याबाबत बाजू मांडली. ते म्हणाले, कालीचरण महाराज जवळपास तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळायला हवे. तीन महिन्यांपूर्वी कालीचरण महाराजने रायपूरच्या धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी (Mahatma Gandhi) अपशब्द वापरले होते. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT