Jagdeep Dhankhar Sakal
देश

ममतादीदींशी पंगा घेणाऱ्या राज्यपालांना बक्षीस? उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

उपराष्ट्रपतींकडे राज्यसभेच्या संचालनाची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालचे बहुचर्चित राज्यपाल जगदीप धनकड (Jagdeep Dhankhar) हे उमेदवार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह प्रमुख पक्षनेत्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी झालेल्या भाजपच्या सर्वोच्च अशा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर धनकड यांचे नाव रात्री उशीरा जाहीर करण्यात आले. उपराष्ट्रपतींकडे राज्यसभेच्या संचालनाची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसने गेल्या काही काळात केलेल्या गदारोळात या पार्श्वभूमीवर धनकड यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी असताना वेळोवेळी घेतलेल्या भूमिका हीच बाब पंतप्रधानांनी भाजप उमेदवार ठरविताना लक्षात घेतल्याचे स्पष्ट आहे. या निवडणुकीत भाजपचे पारडे चांगलेच जड आहे. (Jagdeep Dhankhar News In Marathi )

या पदासाठी भाजपच्या गोटातून माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी, केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान, कॅप्टन अमरिंदर सिंग, नजमा हेपतुल्ला, माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, एस एस अहलुवालिया आदींच्या नावांची वेळोवेळी चर्चा होत होती. अखेरीस धनकड यांच्या उमेदवारीची घोषणा आज करण्यात आली.

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री धनकड यांची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची घोषना करण्यात आली. राज्यघटनेतील कलम ६८ नुसार ६ आॅगस्ट रोजी होणाऱया या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १९ जुलै आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. वर्तमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल १० ऑगस्टला समाप्त होत आहे. भाजपने आपले पत्ते आज उघडल्यावर विरोधी पक्षांची बैठक उद्या (ता.१७) होणार आहे. या निवडणुकीत उमेदवार उतरविण्यास कॉंग्रेसने यापूर्वीच अनिच्छा दर्शविली आहे. उपराष्ट्रपतींची निवड करण्याचा अधिकार फक्त संसद सदस्यांना असतो. (Jagdeep Dhankhar Profile In Marathi)

सध्याचे चित्र पाहिल्यास फक्त व फक्त भाजपकडे सध्याच्या खासदार संख्येच्या जवळपास निम्मी म्हणजे ४०० च्या आसपास मते आहेत. राज्यसभेत भाजपला वेळोवेळी हात देणाऱया अण्णाद्रमुक, बीजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस, बसपा आदींची मते वेगळी असतील. एकूणच भाजपला उपराष्ट्रपती निवडणुकीतील विजयाची चिंता करण्यासारखी स्थिती बिलकूल नाही मात्र वर्तमान भाजप नेतृत्व कोणतीही ‘रिस्क' घेत नाही. धनकड यांची उमेदवारी ठरविताना हीच बाब सत्तारूढ नेतृत्वाने लक्षात घेतल्याचे दिसते.

कोण आहेत राजदीप धनखड

धनकड हे मूळचे राजस्थानचे आहेत. 1989 पासून गेल्या तीन दशकांचा सार्वजनिक कार्याचा तसेच राजकीय अनुभव असलेले धनकर यांनी 1989 मध्ये सर्वप्रथम लोकसभा निवडणूक जिंकली. ते मूळचे राजस्थानातील आहेत. जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस सरकार बद्दल वेळोवेळी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि धनकर यांचे संबंध पराकोटीचे ताणलेले राहिले. पश्चिम बंगाल मधील त्यांची “कामगिरी” पाहूनच त्यांना भाजपने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली हे स्पष्ट मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT