Jaya Bachchan Birthday  sakal
देश

Jaya Bachchan : जया बच्चन यांच्या 'या' एका वाक्याने झाला अमिताभ अन् रेखाचा ब्रेकअप

एक असा काळ होता की जेव्हा अख्ख्या बॉलीवूडमध्ये फक्त अमिताभ आणि रेखा यांच्याविषयीच बोलले जायचे.

सकाळ डिजिटल टीम

Jaya Bachchan Birthday : आज अभिनेत्री जया बच्चन यांचा वाढदिवस. जया बच्चन यांची एक उत्तम बॉलीवूड अभिनेत्री म्हणून ओळख आहे. सध्या त्या राज्यसभेच्या सदस्य आहे. नेहमी त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे त्या चर्चेत येत असतात.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील एक यशस्वी कपल म्हणून ओळखले जाते. एक वेळ अशी होती की जया बच्चन यांची पर्सनल लाईफही चर्चेचा विषय होती.

अमिताभ जरी आज जया बच्चन यांचे पती असले तरी त्यांच नाव गाजलं ते अभिनेत्री रेखासोबत. एक असा काळ होता की जेव्हा अख्ख्या बॉलीवूडमध्ये फक्त अमिताभ आणि रेखा यांच्याविषयीच बोलले जायचे.

मीडिया रिपोर्टनुसार असंही म्हटले जाते की वडिलांच्या आग्रहाखातर अमिताभ यांनी जयाशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या यामुळे पत्नी म्हणून जया बच्चनचं अस्वस्थ होणे, स्वाभाविक होतं पुढे जया बच्चन यांनी खंबीरपणे अमिताभसोबतचे आपले नाते वाचविले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की जया बच्चनच्या फक्त एका वाक्यामुळे अमिताभ आणि रेखाचा ब्रेकअप झाला. ते वाक्य कोणते? आणि नेमकं प्रकरण काय? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत.

जया बच्चन यांना जेव्हा लग्नानंतर अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरविषयी कळले तेव्हा त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन हे एका शुटींगसाठी शहरा बाहेर गेले असता जया यांनी फोन करुन रेखा यांना घरी जेवायला बोलावले.

रेखा या आधीच घाबरल्या होत्या कारण असं अचानक जया यांनी फोन करुन जेवायला बोलवणे , हे खूप आश्चर्यचकीत करणारं होतं आणि तेही अमिताभ बच्चन शहरात नसताना...

जेव्हा रेखा घरी आल्या तेव्हा जया बच्चन यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी खूप छान गप्पा मारल्या. हे सर्व रेखा यांना अनपेक्षित होतं. जेवण झाल्यानंतर जेव्हा रेखा घरी जायला निघाल्या तेव्हा जया बच्चन यांनी रेखाला एक वाक्य म्हटलं की मी काहीही झाले तरी अमिताभ यांना कधीही सोडणार नाही. मग काय याच वाक्यामुळे पुढे अमिताभ आणि रेखा एकमेकांपासून दूर गेले आणि त्यांचं ब्रेकअप झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT