viral video सकाळ डिजिटल टीम
देश

VIDEO: प्रॉपर्टीचा वाद नडला, बापाने मुलाला घराबाहेरच पेटवलं!

उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वडिलाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरूमधील एका व्यक्तीने आपल्या मुलाला दिवसाढवळ्या पेटवून दिल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे, आर्थिक वादातून वडीलाने मुलाला पेटवून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहेत. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी वडिलाला अटक करण्यात आली आहे. मुलाचे नाव अर्पित तर आरोपी वडिलाचे नाव सुरेंद्र आहे.रील दृश्ये काही दर्शकांसाठी त्रासदायक असू शकतात

व्हिडीओ हा सीसीटिव्हीचा असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बांधकाम व्यवसायात असलेला सुरेंद्र आणि त्याचा मुलगा अर्पित त्यांच्या गोदामातून बाहेर पडताना दिसतात. त्यानंतर अर्पित त्याच्या दुचाकीजवळ उभा असतो. सुरेंद्रनी अचानक अर्पितच्या अंगावर पेंट थिनर फेकले नंतर त्याला पेटवून दिले. अर्पित स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

मात्र एका आठवड्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. ही घटना आर्थिक वादातून घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहेत पोलिसांनी सुरेंद्रविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली.

(Disclaimer: Visuals above might be disturbing for some viewers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT