Coronavirus 
देश

Corona : मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून मोठी मदत जाहीर!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली व महाराष्ट्रासह १५ राज्यांत हातपाय पसरलेल्या, दोन जणांचा बळी घेतलेल्या कोरोना या विषाणूच्या साथीला केंद्र सरकारने शनिवारी (ता.१४) राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या आप्तांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केंद्राने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा ट्‌विट करून, ‘कोरोनाशी एकजुटीने लढूया’ असे देशवासीयांसह सार्क राष्ट्रांनाही आवाहन केले. 

कोरोनामुळे कर्नाटक व दिल्लीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये विदेशातून परतलेल्या तब्बल सहा हजाराहून जास्त लोकांना देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दिल्लीत काल रात्री मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास निगमबोध घाट स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांनी आज प्रथम परवानगी नाकारली. नंतर विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आतापवेतो १५ राज्यांत कोरोना पसरला असून केरळपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाची लागण झालेल्या गाझियाबादेतील पितापुत्रांना तसेच आणखी तिघांना गांधी रूग्णालयात दाखल केल्याचे जिल्हा प्रशासनाने आज सांगितले. गोव्यातही पर्यटकांची वर्दळ असलेले कॅसीनो, बोट बार, डान्स बार ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. 

कोरोनाची धास्ती 

- सर्वोच्च न्यायालयात केवळ अत्यावश्‍यक खटल्यांचीच सुनावणी 
- तिहारमध्ये सर्व कैद्यांची तत्काळ आरोग्य तपासणी 
- इटलीतून २१ भारतीयांना घेऊन येणारे एअर इंडियाचे विमान आज कोची विमानतळावर पोहोचले. 
- बंगळूरमधील इन्फोसिसचे सॅटेलाइट कार्यालय बंद 
- आयआयटीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत रद्द 

मोदींचे आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूध्दची लढाई लढण्यासाठी सार्क देशानी एकजूट करावी असे आवाहन केले आहे. मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देताना नेपाळ, अफगानिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश व भूतानसह पाकिस्ताननेही मान्यता दिली आहे. सार्क राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी येत्या एक दोन दिवसांत व्हिडीओ कॉन्परन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

PMC Scam : पुणे महापालिकेत २ कोटींचा गैरव्यवहार! कर्मचाऱ्यांचे गणवेश आणि 'इकोचिप' पावडर ९ वर्षांपासून गोदामात पडून

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आंबेडकरवादी पक्ष-संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT