Chandragupta shipwreck Incident  Team eSakal
देश

1978 जहाज दुर्घटना : प्रवाशांना अंदाजही नव्हता हा त्यांचा शेवटचा प्रवास असू शकतो

Sakal Archives : चांद्रगुप्तच्या शोधासाठी अमेरिकन आरमार आणि विमानाचा ताफा पुढे सरसावला होता.

सुधीर काकडे

वर्ष 1978. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा माल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात बोटींचा वापर केला जात होता. भारतातील अनेक बोटींच्या मार्फत इतर देशांशी व्यापार केला जायचा. अर्थातच 70 च्या दशकातील चित्रपट बघताना आपल्याला दिसतं तसं प्रवासी जहाज म्हणूनही बोटींचा वापर व्हायचा. परंतु आयात-निर्यातीचं साधन म्हणून बोटींकडं, जहाजांकडं बघितलं जायचं. पण हे काम सोपं नव्हतं. आता आहेत तेवढ्या प्रगत सुविधा, तंत्रज्ञान नसल्यानं अनेकदा संपर्क साधनं अवघड जायचं. एखादं जहाज जर अपघातात सापडलंच तर मदत मिळण्यातही उशीर व्हायचा. अशावेळी सर्वकाही बोटीवर असलेल्या सगळ्यांनाच संभाळावं लागायचं. यात त्यांना यश आलं तर ठीक नाही तर मृत्यू अटळ होता.

अशीच काहीशी दुर्घटना त्यावेळी भारतीय बोटीसोबत घडली होती. 1978 हे वर्ष भारताच्या 'एम.व्ही.चंद्रगुप्त' या बोटीसाठी काळ म्हणून आलं असावं. भारताच्या जहाज महामंडळाची म्हणजेच शिपिंग कॉर्पोशनची ही बोट होती. जानेवारी महिन्यात जवळपास 37 हजार टनांचा माल घेऊन ही बोट पॅसिफिक महासागरात प्रवासाला निघाली. हा माल इराण देशाला पोहोच करायचा होता. मालाव्यतिरिक्त 69 जण या बोटींवर उपस्थित होते. यातील 63 कर्मचारी, तर इतर 6 प्रवाशांचा समावेश होता. मात्र त्यांना अजिबात कल्पना नव्हती की, हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास असू शकतो.

प्रवासाला सुरुवात झाली. जहाज हळूहळू अंतर कापत पुढे जात होतं. बोट होनुलुलूच्या वायव्येस पोहोचली तेव्हा वातावरण बिघडलं होतं. अशा वादळी वातावरणातही बोटीनं प्रवास सुरु ठेवला. बोट होनुलुलूच्या वायव्येस 1400 ते 1600 किलोमिटर अंतरावर आली, तेव्हा तिचा संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय जहाज प्राधिकरणानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. नंतर मात्र चंद्रगुप्त बोट बेपत्ता झाली असल्याची माहिती समाज माध्यमांना देण्यात आली. चंद्रगुप्तबद्दल छोट्यातील छोटी गोष्ट वृत्तपत्रातून झळकू लागली.

8 जानेवारीचं वृत्त होतं की बोटींचा तपास अजूनही लागू शकलेला नाहीये. चांद्रगुप्तच्या शोधासाठी अमेरिकन आरमार आणि विमानाचा ताफा पुढे सरसावला होता. समुद्रातील परिस्थिती अजूनही सुधारली नव्हती म्हणून तपासात अडचणी येत होत्या. अपुरा प्रकाश यामागचं मुख्य कारण होतं. चंद्रगुप्तवरून शेवटचा संदेश 6 जानेवारीला सकाळी 10 वाजता मिळाला होता. पण त्यातून काही स्पष्टता मिळाली नाही. काही वेळाने दुसरा संदेश मिळाला ज्यातून समोर आलं होतं की, बोटीमध्ये पाणी शिरलं होतं आणि बोटीवरील लोक ते काढण्यासाठी प्रयत्न करत होते. बोट बुडत होती हे यातून समजलं होतं.

या संदेशानंतर लगेचच संरक्षक विमानं आणि बोटींचा ताफा चंद्रपूरच्या दिशेने निघाला. शोधकार्य सुरु झालं पण वाईट हवामान आणि अपुरा प्रकाश अडथळा बनून उभे होते. प्रयत्न चालूच होता पण कोणतीही माहिती हाती लागत नव्हती. अशावेळी 8 जानेवारीला अमेरिकन आरमार आणि बोटी यांनीही शोधकार्यत सहभाग घेतला. 9 जानेवारीला एक वृत्त झळकलं, ज्यामध्ये काहीतरी सकारात्मक छापून आलं होतं. चंद्रगुप्त बोटींचा जीवरक्षक तराफा अर्धवट बुडालेल्या स्थितीत अमेरिकन नौदलाच्या पथकाला आढळला होता. त्याच दिशेने शोधकार्य पुढे नेण्याचा आदेश नौदलाने दिला होता. शिवाय शोधकार्याला गती मिळावी म्हणून आणखी 9 विमानं पाठवल्या गेली. चंद्रगुप्तवरील सर्व प्रवाशांचे प्राण वाचावे यासाठी अमेरिका प्रयत्नांची शिकस्त करील, असं त्यांच्या परराष्ट्र खात्याने आश्वासन दिलं होतं. पण असाही अंदाज देण्यात आला होता की जहाजावरील कोणीही वाचला नसावा. भारतीय जहाज महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने संबंधित माहिती माध्यमांना दिली होती.

१० जानेवारीला एक वृत्त आलं ज्यामध्ये शिपिंग कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष यांनी दिलेली माहिती होती. कॉर्पोरेशनच्या इतिहासातील ही सर्वात दुःखद घटना होती. अजूनही कॉर्पोरेशनला बोट, त्याचा भाग अथवा कोणाचे प्रेतही हाती लागले नव्हते. चार सपत्निक अधिकारी, २८ अधिकारी, ३४ खलाशी आणि २ मुलं इतकी लोक या जहाजातून प्रवास करत असल्याचं कॉर्पोरेशनने सांगितलं होतं. बोटीत पाणी शिरत असलेला संदेश शेवटचा होता. नंतर संपर्क होऊच शकला नाही. तर १० जानेवारीला कॉर्पोरेशनला मिळालेली ताजी माहिती खूपच नकारात्मक होती. शोधपथकाच्या कामामध्ये पुन्हा वाईट वातावरणामुळे अडथळा निर्माण झाला होता. पण तरीही अमेरिकन नौदलाने माघार न घेता ज्या ठिकाणी जीवरक्षक तराफा आढळला होता तिथे शोधकार्य सुरूच ठेवलं होतं.

तपास कार्यात असलेल्या ९ विमानांपैकी दोन विमानात प्रशिक्षित 'मुक्ती पथक' होती. तर अजून चार बोटी शोधकार्यत सामील होत्या. मात्र १० जानेवरीचं हे वृत्त शेवटचं होतं. नंतर चंद्रगुप्तबद्दल काहीच माहिती माध्यमांना मिळाली नाही. शोधपाठकाने काही दिवसांच्या शोधकार्यानंतर माघार घेतली होती. भारताचा चंद्रगुप्त त्या काळोख्या रात्रीत 'गुप्त' झाला होता, समुद्राच्या उरतही आणि माध्यमांच्या इतिहासातही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT