arvind kejriwal Sakal
देश

''दम असेल तर.... '' केजरीवालांचे भाजपला खुले आव्हान

भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो आणि दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 'हिंमत असेल तर एमसीडी निवडणुका वेळेवर करा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू.' असे खुले आव्हान भाजपला (BJP) दिले आहे. भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो आणि दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटली, तुम्ही दिल्लीच्या छोट्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्या आत काय हिंमत आहे, धिक्कार आहे' असे देखील केजरीवाल यांनी म्हटले आहे. (Arvind Kejriwal Open Challenge To Bjp )

भाजपला आव्हान देताना केजरीवाल म्हणाले की, दिल्ली महापालिकेची (Delhi Corporation Election) निवडणूक पुढे ढकलणे हा इंग्रजांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. आज ते पराभवाच्या भीतीने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत, उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलतील.

दिल्लीच्या उपराज्यपालांच्या आदेशानुसार दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने भाजपला जोरदार हल्लाबोल करत घेरले आहे. आपचा दावा आहे की भाजपला त्यांच्या पक्षाची भीती वाटते, म्हणून त्यांनी निवडणूक पुढे ढकलली.

काही बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार दक्षिण दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका यांचे विलीनीकरण करून दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) पुन्हा स्थापन करू इच्छित आहे. ज्यामुळे आप खूप नाराज असून, यामुळे दिल्ली महानगरपालिकेतील जागांची संख्या कमी होईल, ज्यामुळे सर्व वॉर्डांच्या सीमांकनाचे काम पुन्हा एकदा सुरू होईल जे दीर्घकाळ चालू शकते असे आपचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT