gujarat
gujarat sakal
देश

बरेली दुर्घटनेतून काँग्रेसने घेतला धडा, सर्व कार्यक्रम ढकलले पुढे

निनाद कुलकर्णी

लखनऊ : बरेलीतील बिशप मंडल इंटर कॉलेजच्या मैदानावर आयोजित काँग्रेसच्या 'मैं लड़की हूं, लड़ सकती हूं' मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्यातून धडा घेत पक्षाने यूपीमध्ये होणाऱ्या सर्व रॅली आणि कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी देखील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नोएडा येथे होणारी रॅली रद्द केली आहे. ( Congress Cancelled All Political Rallies & Programmes )

दरम्यान, राजकीय कार्यक्रम रद्द करून भाजप (BJP) काँग्रेसचा मार्ग अवलंबणार का? हे सध्या तरी स्पष्ट झालेले नसून अशा कार्यक्रमांमुळे कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे खूप कठीण होते. सध्या देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron Variant) विषाणू वेगाने पसरत असल्याने येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याती भीती व्यक्त केली जात आहे. (Covid Cases Raised In India)

विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि स्मार्टफोन देणार होते योगी

जिल्हा माहिती अधिकारी राकेश चौहान यांनी सांगितले की, कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री मेरठ मंडळातील सुमारे 2000 विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि स्मार्टफोनचे वाटप करणार होते. यादरम्यान मुख्यमंत्री नोएडा प्राधिकरणासाठी सुमारे 400 कोटी रुपये आणि ग्रेटर नोएडासाठी सुमारे 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार होते.

वाराणसीतील मॅरेथॉन पुढे ढकलण्यात आली आहे

बरेलीतील (Bareilly Accident) दुर्घटनेनंतर काँग्रेसने वाराणसीत होणारी मुलींची मॅरेथॉन पुढे ढकलली आहे. 9 जानेवारीला काँग्रेसच्या वतीने वाराणसीमध्ये 'लड़की हूं लाड शक्ती हूं' मॅरेथॉन होणार होती. काँग्रेसचे वाराणसी महानगर अध्यक्ष राघवेंद्र चौबे यांनी बुधवारी ही माहिती दिली. बरेलीमध्ये मंगळवारी मॅरेथॉनदरम्यान मुलींच्या गटात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात अनेक मुली पडून जखमी झाल्या होत्या त्यानंतर ही मॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT