BJP vs Congress esakal
देश

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजप मंत्री-कॉंग्रेस खासदारात जोरदार राडा

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतच दोघेही व्यासपीठावर एकमेकाला भिडल्याने प्रकरण हातघाईवर आले.

बंगळूर (कर्नाटक) : राज्याचे आयटी-बीटी मंत्री सी. एन. अश्वथ नारायण (C. N. Ashwath Narayan) आणि काँग्रेसचे बंगळूर ग्रामीणचे खासदार डी. के. सुरेश (D. K. Suresh) यांच्यात सोमवारी जोरदार हमरीतुमरी झाली. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतच दोघेही व्यासपीठावर एकमेकाला भिडल्याने प्रकरण हातघाईवर आले. त्याबरोबर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून एकच राडा केला. येथील रामनगर (Ramnagar Karnataka) येथे ही घटना घडली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि बंगळूरचे संस्थापक केम्पेगौडा यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री या नात्याने बोम्मई यांची रामनगरला पहिलीच भेट होती. कर्नाटकातील काँग्रेसचे (Congress) एकमेव खासदार सुरेश यांनी नारायण यांच्या आक्रमक भाषणावर आक्षेप घेतल्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सुरक्षा कर्मचाऱ्‍यांनी हस्तक्षेप केला, तेव्हा काँग्रेस खासदारांनी नारायण यांच्यावर आरोप केले. काँग्रेसचे बंगळूर ग्रामीण विधानपरिषद (Bangalore Rural Legislative Council) सदस्य एस. रवी. सुरेश त्यांच्या साथीला धाऊन आले. त्यांनी नारायण यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी माईक फेकण्याचा प्रयत्न केला. खासदार सुरेश यांनी मंत्री नारायण यांच्या निषेधार्थ मंचावरच ठाण मांडले.

वक्कलिग बहुल रामनगर जिल्हा येथे काँग्रेस आणि धजद प्रमुख राजकीय खेळाडू आहेत. ते भाजपच्या रडारवर आहेत. मंत्री नारायण हे वक्कलिग आहेत. जिल्ह्यात घुसखोरी करून खासदार सुरेश आणि त्याचे बंधू, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना आव्हान देण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न आहे. त्यामुळेच आपल्या भाषणादरम्यान, नारायण यांनी काँग्रेस नेत्यांवर छुपे हल्ले केले आणि भाजप सरकारच्या (BJP Government) कामगिरीची यादी सादर केली. त्यावर गोंधळ सुरू झाली. श्री. सुरेश यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. श्री. बोम्मई यांनी नारायण यांना भाषण थांबवण्यास सांगितले. गोंधळातच श्री, बोम्मई यांनी माईक घेतला. मी येथे विकासाला हातभार लावण्यासाठी आलो आहे. आणि, विकास हा सर्वांच्या सहकार्याने होईल, एका व्यक्तीने नाही, असे सांगून विकासाचे राजकारण करू नका, आंबेडकर आणि केम्पेगौडा यांच्या आदरात वैयक्तिक अहंकार येऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात बोलताना सुरेश यांनी नारायण यांच्यावर रामनगरातील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना रोखल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जर उशीर होण्यास कोणी जबाबदार असेल तर नारायणच त्याला अडवत आहेत. जर रामनगरचे रेशीम अधिक मौल्यवान झाले असेल तर ते भाजपमुळे नाही. राजकीय मतभेद असले तरी या जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी आम्ही नेहमीच एकत्र काम केले आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नारायण यांचे पोस्टर फाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT