Rahul-Gandhi-Congress Sakal
देश

राहुल गांधींची विनंती ED कडून मान्य; 13 जूनला होणार चौकशी

यापूर्वी ईडीने राहुल गांधींना 2 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा समन्स बजावले असून, नव्या समन्सनंतर आता राहुल गांधींना 13 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने राहुल गांधींना 2 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स (ED Summons) बजावले होते. मात्र, राहुल गांधी परदेशात असल्याने पुढील तारीख देण्यात यावी यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल गांधींना नवीन समस्य बजावून 13 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. (ED New Summons To Rahul Gandhi )

राहुल गांधी 19 मे रोजी परदेशात गेले असून, 20 ते 23 मे दरम्यान त्यांनी लंडन येथील आयोजित कार्यक्रमात सहभागी घेतला होता. दरम्यान, राहुल गांधी 5 जून रोजी भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीने राहुल गांधींसह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ईडीने सोनियांना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

राजकीय हेतूने प्रेरित प्रकरणः अभिषेक मनु सिंघवी

दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Sighvi) यांनी बुधवारी मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेते ईडीसमोर हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही या प्रकरणाचा न घाबरता सामना करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून त्यासाठी कोणत्याही चौकशीची गरज नाही.

जर पैसे हस्तांतरित केले नाहीत तर मनी लाँड्रिंग कसं ?

नॅशनल हेराल्ड ?National Herald) हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) द्वारे प्रकाशित केले जाते, जे कर्जात बुडाले होते. त्यानंतर अनेक दशकांमध्ये काँग्रेसने त्यात 90 कोटींची गुंतवणूक केली. भारतातील किंवा परदेशातील प्रत्येक कंपनी जे करते तेच AJL ने केले. कंपनीने आपले कर्ज इक्विटीमध्ये रूपांतरित केले. यानंतर 90 कोटी रुपयांची इक्विटी यंग इंडिया या नवीन कंपनीकडे सोपवण्यात आली.

सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही काँग्रेस नेत्यांचे यंग इंडियामध्ये वाटा आहे. यंग इंडिया ही ना-नफा कंपनी म्हणून नोंदणीकृत होती. या व्यवहारातून एजेएल ही कर्जमुक्त कंपनी बनली. एकही मालमत्ता आणि पैसा हस्तांतरित केला नाही, मग मनी लाँड्रिंग कुठे आहे? पैसा कुठे आहे? पैसे हस्तांतरित केले गेले नाहीत तरीही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल कसा झाला असा प्रश्नदेखील सिंघवी यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT