Memories of 'Ae Mere Watan Ke Logo' song
Memories of 'Ae Mere Watan Ke Logo' song Esakal
देश

Lata Mangeshkar: लतादीदींचं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाणं ऐकून नेहरूंचे अश्रू अनावर; वाचा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

27 जानेवारी 1963 चा तो दिवस... तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Javaharlal Nehru) , राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशभरातील अनेक लोक दिल्लीतील (Delhi) नॅशनल स्टेडीयमवर एकत्र जमले होते. चीनसोबतच्या युद्धाच्या कटू आठवणी देश अजून विसरला नव्हता. अशातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) उभ्या राहिल्या आणि चीन युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांनी एक गीत गायलं. हे गीत (Song) ऐकून तिथं उपस्थित लोकांच्या डोळ्यांतून आपसूकच अश्रू अनावर झाले. स्वतः पंडित नेहरूसुद्धा अश्रू रोखू शकले नाहीत. आज इतकी दशके उलटूनही हे गीत ऐकल्यावर भारतीयांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाहीत. सर्व भारतीयांच्या मनावर राज्य करणारे हे अजरामर गीत होतं ‘ऐ मेरे वतन के लोगो’...(Lata Mangeshkar Marathi News)

ऐ मेरे वतन के लोगो’ गीताची कहाणी (Story of 'Ae Mere Watan Ke logo' song)-

‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत माहिती नाही असा एकही व्यक्ती भारतात नसेल. कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले हे एक सुप्रसिद्ध हिंदी देशभक्तीपर गीत आहे. हे गीत 1962 च्या चिनी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते. हे गाणं ऐकून इतर लोकांप्रमाणे पंतप्रधान नेहरूसुद्धा स्वतःच्या डोळ्यांतील अश्रू रोखू शकले नाहीत.

इतक्या दशकानंतर आजही कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात हे गीत वाजल्याशिवाय राहत नाही. हे गीताने अनेकांच्या अंगात देशभक्तीची भावना पेरली.

लतादीदींनी दिला होता नकार (Latadidi had refused to Sing)-

या गाण्याचा किस्सा खूपच रंजक आहे. खरंतर लता मंगेशकर यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आशा भोसले यांच्या नावाचा विचार झाला. परंतु या गाण्याला लता दीदीच न्याय देऊ शकतील, असं कवी प्रदीप यांचे ठाम मत होते. त्यामुळेच त्यांनी लतादीदींच मन वळवले आणि त्यातून एका अतुलनीय कलाकृतीचा जन्म झाला, जी आजही भारतीयांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. विशेष म्हणजे यंदापासून प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीट कार्यक्रमामध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताचा समावेश करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT