Cold wave Nagpur mercury at 7.8 degrees sakal
देश

दोन दिवसांत कडाक्याच्या थंडीसह दाट धुके पडण्याची शक्यता

दिल्लीसह उत्तर भारतातील नागरिकांना थंडीपासून अद्याप दिलासा मिळालेला नाही

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीसह उत्तर भारतातील नागरिकांना थंडीपासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. दोन दिवसांत कडाक्याच्या थंडीसह दाट धुके (Extreme cold) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये पुढील दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुढील चोवीस तासांत राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके (Extreme cold) पडतील. १८ जानेवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. २१ जानेवारीपासून वायव्य भारतावर आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशात रात्री व सकाळी काही ठिकाणी दाट धुके आणि जम्मू विभाग आणि हिमाचल प्रदेशमध्ये रात्री व सकाळी दाट धुके राहील. पुढील दोन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे पुढील दोन दिवसांत थंड दिवस ते अतिशय थंड दिवस आणि पुढील तीन दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश येथे थंड (Extreme cold) दिवस अशी परिस्थिती आहे.

हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

रविवारी उत्तर भारतातील विविध भागांमध्ये धुके दिसून आली. धुक्यामुळे लखनौमधील दृश्यमानतेवर परिणाम झाला, तर मध्य प्रदेशातील थंडीच्या (Chance of fog) लाटेने भोपाळला वेढले. १९ आणि २० जानेवारीला अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि आंध्र प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT