देश

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली, FIR होणार दाखल

नेमकं काय प्रकरणं आहे? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रसिद्ध किर्तनकार हभप इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकरांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (FIR will be filed on Indurikar Maharaj after Supreme Court rejected his petition)

काय आहे प्रकरण?

हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिर्डीतील ओझर इथं एका किर्तनात पुत्रप्राप्तीबाबत कोणताही वैज्ञानिक आधार नसलेलं दिशाभूल करणार विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. इंदुरीकरांनी केलेलं विधान हे गर्भलिंगनिदानाची जाहिरात केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. PCPNDTच्या सल्लागार समितीनं या विधानावरुन इंदुरीकरांना कारणेदाखवा नोटीस पाठवली होती.

यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सत्र न्यायालायनं इंदुरीकांवरील गुन्हा दाखल करण्याचा आदेश रद्द ठरलला होता. यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात इंदुरीकरांविरोधात तीन वकिलांनी धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं सत्र न्यायालायाचा आदेश रद्द केला होता. (Marathi Tajya Batmya)

सुप्रीम कोर्टात आव्हान

दरम्यान, औरंगाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला इंदुरीकरांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत याचिका निकाली काढली. त्यामुळं इंदुरीकांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Marathi News)

इंदुरीकरांनी नेमकं काय म्हटलं होतं?

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डीतील ओझर इथं एका किर्तनात दावा केला होता की, "स्त्री-पुरुषाचा संग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि जर विषय तिथीला झाला तर मुलगी होते. पण जर या तिथी हुकल्या तर मुलं बेवडी, खानदानाचं नाव मातीत मिसळणारी होतात.

यासाठी त्यांनी पुलश्य नावाच्या ऋषीचं उदाहरण देताना त्यानं कैकसी नावच्या स्त्री बरोबर सूर्य मावळत असताना संग केल्यामुळं रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले. तसेच आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केल्यामुळं त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू हा राक्षस जन्माला आला. या हिरण्यकशपूनं नारायण म्हणून संग केल्यानं भक्त प्रल्पाद जन्माला आला, असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT