birendra singh
birendra singh 
देश

'मी आधी शेतकऱ्याचा मुलगा, नंतर नेता'; मंत्रीपद भूषवलेल्या भाजप नेत्याचं शेतकऱ्यांना समर्थन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या कायद्याला देशभरातून शेतकरी संघटनांसह विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र भाजप नेते हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून दलालांचं असल्याचं म्हणत आहेत. असे असताना मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या भाजप नेत्याने शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. 

आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह हे रोहतकमधील सांपला इथं पोहोचले. त्यांनी सांगितलं की, ते सरकारविरोधात नाहीत मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने नक्की आहेत. मी सर छोटुराम विचारमंचचा सदस्य आहे. सर छोटुराम असे नेते होते ज्यांनी स्वांतंत्र्याच्या आधी आपल्या भागात शेतीच्या सुधारणांसाठी काम केलं होतं. छोटुराम विचार मंच शेतकऱ्यांच्या  मागणीचे समर्थन करतो. त्याचा सदस्य असल्यानं मी शेतकऱ्यांसोबत उभा आहे असं ते म्हणाले.

विरेंद्र सिंह यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांचं समर्थन करणं हे आपल्या पक्षाच्या विरोधात जाणं नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा हा राजकारणाच्या पलिकडे आहे. जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून. आता शिकून राजकारणात आलो याचा अर्थ असा नाही की मागचं सगळं विसरलो. मी आधी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि नंतर नेता. शेतकऱ्यांची साथ देणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे. 

सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही काहीच मार्ग निघालेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही चर्चेतून हा प्रश्न सोडवायला हवा असं म्हटलं आहे. याबाबत बोलताना विरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी. चर्चेतून कोणत्याही समस्येवर उपाय मिळू शकतो. मी शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतो की, त्यांनी संवाद करावा. आंदोलनामध्ये ना शेतकऱ्यांचं हित आहे ना देशाचं. 

भाजप नेते विरेंद्र सिंह यांनी कैथल इथं बोलताना म्हटलं होतं की, जर शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला तर मी त्यांचे नेतृत्व करण्यासाठी तयार होतो. सरकारने कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांच्या शंकेचं समाधान केलं पाहिजे. विरेंद्र सिंह हे हरियाणाचे असून मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT