Mahatma Gandhi Punyatithi esakal
देश

Mahatma Gandhi Punyatithi : आजवर 'या' अभिनेत्यांनी साकारली आहे गांधीजींची भूमिका..

आजवर गांधीजींवर अनेक चित्रपट होऊन गेलेत, प्रत्येकाने आपले बापू त्यांना पटले, दिसले, कळले तसे मांडले.

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Gandhi Role Played by Actors : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाने सारा देश जणू आपल्या डोक्यावरून पित्याच छत्रच हरवलं आहे या दुःखात रडत होता. गांधीजी भारतासाठी खूप झटले आहेत, वेळप्रसंगी स्वतःच्या जिवाचीही त्यांनी परवा केली नाही. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या घालून त्यांची हत्त्या केली होती.

आजवर गांधीजींवर अनेक चित्रपट होऊन गेलेत, प्रत्येकाने आपले बापू त्यांना पटले, दिसले, कळले तसे मांडले; त्यातल्या काही भूमिकांना लोकांनीही अगदी डोक्यावर उचलले होते.

Mahatma Gandhi Role Played by Actors

बेन किंग्सले (१९८२)

ऑस्कर विजेता चित्रपट गांधी हा गांधीजींच्या आठवणींवर आधारित आहे. यात ब्रिटीश अभिनेता बेन किंग्सलेने महात्मा गांधींची भूमिका साकारली, ज्याने प्रत्येकाच्या मनावर दीर्घकाळ छाप सोडली आहे. हा चित्रपट गांधींच्या जीवनातील विविध पैलू आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या हत्येपर्यंतच्या काळांचे प्रतिनिधित्व करतो.

Mahatma Gandhi Role Played by Actors

अन्नू कपूर (१९९३)

केतन मेहता दिग्दर्शित सरदार वल्लभभाई पटेल बायोपिकमध्ये गांधीजींच्या भूमिकेत अभिनेता अन्नू कपूरची भूमिका छोटी होती. पण, बेन किंग्सले यांच्यानंतर गांधीजींची भूमिका करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले, हे कौतुकास्पद आहे.

Mahatma Gandhi Role Played by Actors

रजित कपूर (१९९६)

द मेकिंग ऑफ द महात्मा (१९९६) च्या श्याम बेनेगल दिग्दर्शित या चित्रपटात, रजित कपूर यांनी दक्षिण आफ्रिकेतील २१ महत्त्वपूर्ण वर्षांच्या काळात गांधींची भूमिका साकारली होती. फातिमा मीर यांच्या 'द अप्रेंटिसशिप ऑफ अ महात्मा' या पुस्तकावर आधारित 'द मेकिंग ऑफ द महात्मा' या चित्रपटाला रजित कपूर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

Mahatma Gandhi Role Played by Actors

मोहन गोखले (१९९८)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असून यात मराठी अभिनेते मोहन गोखले यांनी महात्मा गांधींच्या भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००० मध्ये व्यावसायिकरित्या पुन्हा प्रदर्शित झाला.

Mahatma Gandhi Role Played by Actors

नसीरुद्दीन शाह (२०००)

कमल हसन यांच्या हे राम या चित्रपटात गांधीची भूमिका आधी मोहन गोखले साकारणार होते पण शूटिंग सुरू होण्याआधीच त्यांच्या मृत्यू झाल्याने ही भूमिका नंतर नसीरुद्दीन शहा यांनी साकारली.

Mahatma Gandhi Role Played by Actors

दिलीप प्रभावळकर (२००६)

लगे रहो मुन्ना भाई (2006) राजू हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधींची भूमिका सभ्य, विनोदी अन् मायाळू स्वभावाचे नेतृत्व करत साकारली. या भूमिकेने लाखो चित्रपट रसिकांची मने जिंकली. कॉमेडीमध्ये रामाणिकपणा, मानवतावाद आणि अहिंसा या गांधीवादी श्रद्धेने जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवली जाऊ शकते याचे चित्रण केले आहे. या चित्रपटाला चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

Mahatma Gandhi Role Played by Actors

दर्शन जरीवाला (२००७)

गांधी, माय फादर (२००७) हा बॉलीवूड चित्रपट अनिल कपूर निर्मित असून या चित्रपटात महात्मा गांधीजी आणि त्यांचा मुलगा यांच्यातील विस्कळीत नाते दाखवण्यात आले आहे. दर्शन जरीवालाने गांधीजींची भूमिका केली आणि अक्षय खन्ना याने हरिलाल गांधींची भूमिका साकारली. स्वातंत्र्यलढ्यातील गांधींच्या भूमिकेव्यतिरिक्त, त्यात त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही पैलूंचे चित्रण आहे.

Mahatma Gandhi Role Played by Actors

सुरेंद्र राजन

अभिनेते सुरेंद्र राजन यांनी अनेक चित्रपटांमध्ये गांधीजींची भूमिका साकारली आहे. लिजेंड ऑफ भगतसिंग, वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो यासह अनेक प्रसंगी फादर ऑफ द नेशनची भूमिका साकारली आहे.

Mahatma Gandhi Role Played by Actors

दिपक अंतानी (२०२३)

सध्याचा बहूचर्चित सिनेमा म्हणजे गांधी गोडसे एक युद्ध. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर गांधी आणि गोडसेंची एक वेगळी बाजू समजून घेयला प्रवृत्त करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT