girl did murder of her new born baby at chhattisgarh 
देश

प्रियकर हवा पण स्वतःचे बाळ नको म्हणून तिने...

वृत्तसंस्था

रायपूर (छत्तीसगड): प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिने बाळाला जन्म दिला. पण, जन्म दिल्यापासून बाळाला दूध पाजलेच नाही. प्रियकर बाहेर गेल्यानंतर बाळाचा गळा दाबला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. याप्रकरणी युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमराज याचे मोनिकासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मोनिका गर्भवती राहिल्यानंतर खेमराजने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. परंतु, मोनिका नाराज होती. मोनिकाने 6 जानेवारी रोजी बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यापासून मोनिका स्तनपान करत नव्हती. बाळ सतत रडत असल्यामुळे खेमराजची वहिणी बाळाला दूध पाजत होती. बाळ पाच दिवसांचे झाल्यानंतर खेमराज कामानिमित्त घराबाहेर गेला होता. यावेळी मोनिकाने बाळाचा गळा दाबून खून केला व मृतेदह तलावात फेकून दिला. खेमराज घरी आल्यानंतर बाळाला कोणीतरी घेऊन गेले म्हणून रडू लागली. खेमराजने बाळाचा शोध घेतला पण न सापडल्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला. पण, बाळ आढळले नाही. मोनिकाची चौकशी सुरू केल्यानंतर ती आडखळू लागली. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिने बाळाचा खून केल्याचे सांगितले. मोनिकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड

Supreme Court Order: सॅनिटरी पॅड नसेल तर शाळा नाही! सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश

बीडच्या गुरुजींनी निभावली अजित पवारांवरील अंत्यसंस्काराची जबाबदारी; आठ वर्षांपासून पवार कुटुंबियांकडे पौरोहित्य

SCROLL FOR NEXT