Man kills live-in partner for refusing to cook food Esakal
देश

Man kills live-in partner: माणूस की हैवान? अंडाकरी बनवली नाही म्हणून लिव्ह-इन पार्टनरची हत्या; प्रेयसीवर हातोड्याने केले वार

Man kills live-in partner for refusing to cook food: श्रध्दा वालकरसारख्या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधून लिव्ह इन पार्टनरने आपल्या प्रेयसीची क्षुल्लक कारणावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Man kills live-in partner for refusing to cook food: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खून, मारामारी, यांच्यासोबतच गेल्या काही दिवसांमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून लिव्ह इन पार्टनरच्या हत्येची प्रकरणं देखील वाढल्याचे चित्र आहे. श्रध्दा वालकरसारख्या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधून लिव्ह इन पार्टनरने आपल्या प्रेयसीची क्षुल्लक कारणावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्येचे कारण ऐकून पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण तिने त्याच्यासाठी अंडाकरी बनवण्यास नकार दिला. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राम पोलिसांना चौमा गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात एका महिलेचा मृतदेह सापडला. याप्रकरणी मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी शनिवारी सांगितलं आहे.

आरोपीने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, जेव्हा लिव्ह इन पार्टनरने त्याच्यासाठी अंडी करी बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने दारूच्या नशेत तिला हातोड्याने आणि बेल्टने मारहाण करून तिची हत्या केली. बिहार येथील मधेपुरा जिल्ह्यातील औराही गावातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपी यादवला पालम विहार पोलीस स्टेशनच्या पथकाने दिल्लीतील सराय काले खान परिसरातून अटक केली आहे.

32 वर्षीय अंजली बुधवारी चौमा गावात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मृत आढळून आली. मृतदेह पाहिल्यानंतर केअरटेकरने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यादव आणि मृत अंजली या दोघांना इमारतीच्या बांधकामाच्या कामासाठी 10 मार्च रोजी गुरुग्राम बसस्थानकावरून आणलं होतं. त्यावेळी आरोपीने अंजली आपली पत्नी असल्याचं सांगितलं होतं. चौकशीत आरोपीने सांगितलं की, त्याच्या पत्नीचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर तो दिल्लीला आला होता.

तर मृत अंजली कचरा वेचण्याचं काम करत होती. सुमारे सात महिन्यांपूर्वी आरोपी आणि अंजली यांची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे सोबत राहु लागले. पालम विहारचे एसीपी नवीन कुमार यांनी सांगितले की, अंजलीची हत्या करून आरोपी फरार झाला होता. त्याने हत्या करताना वापरलेला हातोडा आणि बेल्ट जप्त केला असून आरोपींची चौकशी करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT