Priyanka Gandhi_himachal pradesh political crisis 
देश

Vikramaditya Singh: काँग्रेसच्या आणखी एका 'राजकुमारा'चं बंड! प्रियांका गांधी अपयशी ठरल्या का?

himachal pradesh political crisis : हिमाचल प्रदेशात सध्या राजकीय संकट निर्माण झालं असून काँग्रेसचं सरकार अडचणीत आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Himachal Pradesh Political Crisis Marathi News : काँग्रेसच्या आणखी एका राजकुमारानं बंड केलं असून हा राजकुमार अर्थात राज घराण्यातील व्यक्ती म्हणजे विक्रमादित्य सिंह. हिमाचल प्रदेशचे मंत्री असलेले विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी आपले वडील वीरभद्र सिंह यांची उपेक्षा केल्याचा आरोप केला आहे.

तसेच आपल्याच सरकारवर त्यांनी तरुणांचीही उपेक्षा केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग करुन काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव केला. या सर्व परिस्थितीमुळं हिमाचलमध्ये राजकीय संकट निर्माण झालं आहे.

पण आता काँग्रेसनं हिमालच प्रदेशची जबाबदारी सोपवलेल्या प्रियांका गांधी वड्रा ही राजकीय परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्या का? असा सवाल केला जात आहे. (himachal pradesh political crisis vikramaditya singh got rebel did priyanka gandhi fail to handle state situation)

हिमाचलची परिस्थिती का बिघडली?

वीरभद्र सिंह यांची पत्नी आणि मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या मातोश्री प्रतिभा सिंह यांची स्वतः मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. पण प्रियांका गांधी यांच्यामुळं त्यांचं हे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं होतं. पण त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं होतं.

पण शेवटी त्यांनी आपल्या आई-वडिलांचा काँग्रेसनं अपमान केल्याचं सांगत बंड केलं आहे. त्यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह पहिल्यांदा राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलं त्यानंतर विक्रमादित्य सिंह यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामी दिला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे समर्थक आमदरही फुटण्याच्या मार्गावर आहेत. यातील एका आमदारानं खुलेआम आपण भाजपसोबत असल्याचं म्हटलंही आहे. (Latest Marathi News)

प्रियांका गांधी कशी हाताळणार परिस्थिती?

यामुळं हिमाचल प्रदेशमध्ये खरंतर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, पण आता इथल्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधी ही परिस्थिती हाताळतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. जर त्यांना ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आली नाही तर काँग्रेस अडचणीत येऊ शकते. (Marathi Tajya Batmya)

कारण जर प्रतिभा सिंह यांनी पण बंड केलं तर त्यांना भाजप साथ देऊ शकतं. पण प्रियांका गांधी यांच्या मदतीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक असलेले डीके शिवकुमार यांना हिमाचल प्रदेशकडं रवाना होण्याचे आदेश दिले आहेत. (Marathi Tajya Batmya)

तरुण नेत्यांना सांभाळणं काँग्रेससाठी डोकेदुखी

आपल्या तरुण नेत्यांना सांभाळणं खरंतर काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठऱली आहे. करण यापूर्वी अशाच प्रकारे मध्य प्रदेशात शिंदे राजघराण्याचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केल्यानं तिथं काँग्रेसचं सरकार कोसळलं होतं. यापूर्वी हिमंता बिस्व सर्मा आणि ममता बॅनर्जींनी देखील तरुण वयातच बंड केल्यानं काँग्रेसला त्याची आजही किंमत मोजावी लागत आहे.

केंद्रीय नेतृत्व आपल्या पाठिशी असल्याचा दावा

दरम्यान विक्रमादित्य सिंह यांनी सरकारवर जरी आरोप केलेले असले तरी पक्षाच्या अध्यक्षांवर आणि हायकमांडवर अद्याप आरोप केलेले नाहीत. तसेच केंद्रीय नेतृत्व आपल्या पाठिशी असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळं जर काँग्रेस नेतृत्वां त्यांच्या मागण्या मान्य केल्यातर काँग्रेस या बंडापासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचू शकते.

हिमाचलमध्ये काँग्रेस म्हणजे वीरभध्र सिंह यांचा पक्ष

हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा चेहरा म्हणजे वीरभद्र सिंह अस मानलं जातं. आता ही ओळख त्यांच्या कुटुंबांसाठी देखील बनली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रतिभा सिंह यांनी आपली पूर्ण ताकद लावून वीरभद्र सिंह यांच्या भावनात्मक मुद्द्यांवर मतं मागितली होती. त्याचवेळी असंही मानलं जात होतं की, काँग्रेस प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करेल.

पण काँग्रेसनं त्यांचा चेहरा पुढे केला नाही कारण भाजपकडून सातत्यानं काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष म्हणून संबोधत आलं आहे. या आरोपांपासून वाचण्यासाठी प्रतिभा सिंह यांना मुख्यमंत्री बनवलं नाही. पण त्यांचे त्यांच्या मुलाला विक्रमादित्य सिंह यांना सन्मान देताना मंत्रीपदही बहालं केलं. पण आजच्या घडामोडींवरुन हे स्पष्ट झालं आहे की, वीरभद्र सिंह यांचा परिवार अद्याप संतुष्ट झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT